निसर्गोपचार केंद्रात उपचार साठी परगावी वरुन आली होती महिला, पुणे एकदा परत हादरले

 पुणे दि. ०९ :- मणक्याचे त्रास होत असल्याने उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला पिस्तुलाचा धाख दाखवून बलात्कार करण्यात आला उपचारासाठी अनेक दिवस रहावे लागणार असल्याने भाड्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन एका महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 


याप्रकरणी हडपसर पोलिसांनी संजय बाजीराव भोसले (वय ५२, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) याला अटक केली आहे. या बाबत गाझीयाबाद येथील एका ३९ वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केले आहे गु. रजि. नं. ५३/२३ असे आहे. हा प्रकार हडपसरमधील जयप्रकाश सोसायटीत ५ जानेवारी रोजी दुपारी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबाद येथील एक महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यांनी संजय भोसले यांच्याकडे विचारणा केली. तेव्हा त्याने रुम दाखविण्याचा बहाणा करुन त्यांना जयप्रकाश सोसायटीत नेले. तेथे त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यांच्यावर बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी दिली. हडपसर पोलिसांनी त्याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

 बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞 {9767508972}

{7219500492}

{9850826340}

YOUR REACTION?

Facebook Conversations