येत्या ३० अप्रैलला निवडणूक होणार यंदा देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे समावेश नाही, अनेक पक्ष, कार्यकर्ता चे तोंडाला पाने पुसली,नागरिक ही नाराज.

द जस्ट आज  न्युज दि. २१ :- देशातील ६२ कॅन्टोन्मेंट बोर्ड पैकी फक्त ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे निवडून जाहीर करण्यात आले आहे येत्या ३० अप्रैल रोजी निवडून होणार आहे सात वर्षांच्या कालावधीनंतर पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट  बोर्डांची ३० एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अधिकृत अधिसूचनेनुसार यामध्ये ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डांचा सहभाग असणार आहे. मात्र, यंदा देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा या अधिकृत अधिसूचने मध्ये समावेश नाही.त्यामुळे अनेकांची नगरसेवक होण्याची स्वप्ने भंग झाली आहे निवडणूक होणार म्हणून अनेक राजकीय पक्ष व कार्यकर्ता गुडघ्याला बाशिंग बांधून तैयार होते देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाव नसल्याने अनेक पक्ष संघटनेचे लोक नाराजी व्यक्त केले आहे. देहूरोड सह दिल्ली, अंबाला इतर दोन अशा पाच कॅन्टोन्मेंट बोर्डाचे नाव अधिसूचना मध्ये नाही सद्या या आस्थापनावर प्रशासक राज आहे निवडणूक नंतर हे प्रशासक राज संपुष्टात येणार आहे.केंद्रीय मंत्रालयाचे सह सचिव राकेश मित्तल यांनी या संदर्भात आधिसुचना काढली अधिसूचनेनुसार ६२ पैकी ५७ कॅन्टोन्मेंट च्या निवडणुक जाहीर झाले आहे या छावण्या मध्ये पुणे, खडकी, नगर,औरंगाबाद, नाशिक मधील देवळाली आणी नागपूर मधील कामठी या राज्यातील अशा एकुण सहा कॅन्टोन्मेंट बोर्डाची निवडून पार पडणार आहे. मात्र देहूरोड  कॅन्टोन्मेंट बोर्डाचा उल्लेख दिसुन येत नसल्याने येथील निवडणूक पार पडणार की नाही अजुन हे स्पष्ट होत नाही कॅन्टोन्मेंट कायदा २०१६च्या कलम १५ मधील कलम एक याद्वारे केंद्र सरकार कडून ५७ जागी निवडून ३० अप्रैल रोजी घेण्याचे आदेश दिले आहेत. देहूरोड सह ५७ कॅन्टोन्मेंट बोर्डाचे कार्यकाळ फेब्रुवारी २०२० मध्ये संपलेला होता केंद्र संरक्षण मंत्रालया कडून दोन वेळा मुद्दत वाढवून दिली होती कॅन्टोन्मेंट कायदा २०१६ नुसार तिसऱ्यांदा अशी मुद्त वाढ देता येत नाही त्यामुळे १० फेब्रुवारी २०२१ मध्ये हे बोर्ड विसर्जित करण्यात आले होते.

 काय कारण निवडणुका का लांबल्या ? 

केंद्र सरकारकडून प्रचलित कॅन्टोन्मेंट कायदे मध्ये अनेक नागरीकेंद्रीय सुधारणा होण्यासाठी प्रस्ताव ठेवले होते यात बोर्डातील सर्व नागरिकांना मतदानाचा अधिकार उपाध्यक्ष यांची थेट निवड जनतेतून होवो असे विविध बदल प्रस्तावित आहेत तसेच कॅन्टोन्मेंट हद्दीतील नागरी भाग लगतच्या महापालिका हद्दीत विलनीत करण्याचा प्रस्ताव इत्यादी प्रश्न होते वस्तू व सेवा कराचा (जीएसटी) ही बंद झाल्याने बोर्ड अडचणी आहे बोर्ड क्षेत्रातील मुलभूत विकास काम कोळंबुन पडले आहेत असे अडचणीचे प्रश्न असताना देखील निवडणुका पार पडणार आहेत.        

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डातील एकूण आठ वॉर्डांपैकी महिलांसाठी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डात २, ५ आणि ६ वॉर्ड राखीव आहेत. वॉर्ड क्रमांक ४ पीसीबीमध्ये अनुसूचित जाती उमेदवारासाठी राखीव आहे, तर १ साठी केसीबी  मध्ये एस सी/एस टी साठी राखीव ठेवण्यात आले आहे.

पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डात अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मतदार यादी अंतिम झाली असून आठ प्रभागांमध्ये एकूण ३८३२७ मतदार आहेत. देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हे अगदी नवीन आहे. सुमारे पन्नास हजार लोकसंख्या असलेल्या या मंडळाचे सात प्रभाग आहेत.काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या भागात हे सातही प्रभाग मध्ये गेल्या निवडणुकीत भाजपचे ५ उमेदवार जिंकले होते. त्यामुळे यंदा काय निकाल लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations