पुणे एकदा परत हादरले, सात वर्षीय चिमुकुलीचे अपहरण करून लैंगिक शोषण.
पुणे महिला मुलीनसाठी सुरक्षित नाही, निर्भया आपल्या वडीलांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेले असता परतताना अज्ञाताने केले अपहरण आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

पुणे दि. ९ :- पुणे आता महिला व मुलीन साठी सुरक्षित राहीलेले नाही असे चित्र सद्या दिसत आहे चार दिवसापूर्वी मावळ मध्ये ७ वर्षीय चिमुकुलीचे अपहरण बलात्कार करून हत्या करण्यात आली होती ही घटना ताजी असतानाच परत एकदा पुणे मध्ये एका सात वर्षीय चिमुकुलीचे अपहरण करून शोषण करण्याचा प्रयत्न झाले आहे , काही महिने पुर्वी ही पुणे रेल्वे स्थानकावरून एका मुलीचे रिक्षा चालकाने व त्याचे साथीदारांनी पळवून रात्रभर आळीपाळीने बलात्कार केला होता. आता एका चहा विकण्याऱ्या हातगाडी चालक असलेल्या वडीलांना डबा देण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय चिमुकलीचे अज्ञाताने पुणे स्टेशन परिसरातून अपहरण करून लैंगिक शोषण केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. 

या घटनेने पुन्हा एकदा पुणे हादरले असून,महिला व मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अद्याप या अज्ञात आरोपीचा थांगपत्ता लागलेला नाही.

याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलिस ठाण्यात निर्भयाच्या वडीलांनी तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी व्यक्तीवर पोस्को व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी भरदुपारी ही घटना पुणे स्टेशन परिसरात घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, निर्भयाचे वडिलांचा पुणे रेल्वस्टेशन परिसरात चहाचा स्टॅाल आहे. त्यांना जेवणाचा डब्बा देण्यासाठी ही चिमकुली निर्भया गेली होती. वडीलांना डबा देऊन ती परत घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर अज्ञाताने तिला उचलून नेत तिचे अपहरण केले. तसेच तिला फलाट क्रमांक ६ च्या भिंतीलगत कंस्ट्रक्शन ऑफिसच्या शेजारील रेल्वेच्या बंद असलेल्या आय.ओ.डब्लयू (IOW) ऑफिसच्या येथे नेऊन तिचे लेैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. निर्भया ओरडू लागल्यानंतर आरोपीने तिला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, लघुशंका करण्याच्या बहाण्याने ही छोटी निर्भया या नराधमाच्या तावडीतून कसेबसे पळ काढला. तिने थेट पळत पळत घर गाठले आणि सर्व आईला घडला प्रकार सांगितला. हे ऐकताच  आईने वडिलांना ताबडतोब सर्व माहिती दिली. 

त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. घटना समजताच वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीकरून आरोपीचा माग काढला जात आहे. परंतु अद्याप त्याचा थांगपत्ता लागलेला नाही.

यामुळे परत एकदा महिला मुलींचे सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी अधिक तपास बंडगार्डन पोलिस करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations