नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात महाविकास आघाडीच्या वतीने तीव्र संताप व्यक्त, जोरदार घोषणाबाजी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 

देहूरोड दि. निर्भय सभेसाठी निघालेले जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, असीम सरोदे, आणि महिलांवर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी दिनांक ११ रोजी पुणे येथे गाडीच्या काचा फोडून जीवघेणा हल्ला केला त्याचा तीव्र पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळत आहे देहूरोड महाविकास आघाडीच्या वतीने पत्रकार श्री निखिल वागळे, श्री विश्वंभर चौधरी,श्री असिम सरोदे व महिलांवर केलेल्या भाजपाच्या भ्याड हल्ल्याच्या निषेदार्थ निषेध आंदोलन करण्यात आले.

या वेळी भाजपाच्या विरोधात नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काळ्या फिती लावुन जाहीर निषेध व्यक्त केला हल्ल्याचा तीव्र संताप व्यक्त करत शिवसेनेचे जेष्ठ नेते (उद्धव ठाकरे गट) शिवसेनेचे विशाल दांगट आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुतू, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते मिक्की कोचर आदिनी या महाराष्टात कायदा सुव्यवस्था पुर्णपणे ढासळलेली आहे दिवसाढवळ्या गोळीबार सारखे प्रकार घडत आहेत या महाराष्ट्राचे बिहार होत आहे असे  तीव्र शब्दात भाजपाचा विरोधात संताप व्यक्त केला. गृहराज्यमंत्री यांनी आपला राजीनामा द्यावा असे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करून यावेळी निषेध व्यक्त करताना या 

भाजपाचे करायचे काय खाली डोके वर पाय, 

निषेध निषेध जाहीर निषेध, भाजपाचा जाहीर निषेध, 

पत्रकारांवर हल्ले सहन करणार नाही

 पत्रकारांवर हल्ले करणाऱ्या कार्यकर्त्यांचा जाहीर निषेध जाहीर निषेध असे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

यावेळी देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष मिकी कोचरशिवसेना उद्धव ठाकरे गटाचे भरत नायडू,काँग्रेसचे अध्यक्ष हाजीमलंग मारीमुत्तू , ज्येष्ठ नेते रफिक शेख,जेष्ठ नेते रेणू रेड्डी ,शिवसेनाचे जेष्ठ नेते रमेश जाधव ,राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन भुबंक ,सुरेश भारस्कर, गोविंद राऊत ,शिवाजी दाभोळे अँथोनी स्वामी ,दिपक कसबे ,अक्षय टाक ,आकाश भुंबक, सुरेश सातकर ,रोहित झेंडे ,विभाग प्रमुख मेहरबान सिंग तखखी, शशिकांत सपगुरू, देवा कांबळे ,काँग्रेसचे जेष्ठ नेते व्यंकटेश कोळी, जेष्ठ नेते जलाल शेख, अल्पसंख्याक सेल चे  गफूरभाई शेख ,बबन टोम्पे ,आकाश राजलिंगम ,संभाजी पिंजन ,गौतम शिंदे आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations