प्रसिद्ध कामेडियन राजु श्रीवास्तव ( गजोधर) यांचा निधन.
तेजाब चित्रपट ने केली होती सुरूवात लाफ्टर चैलेंज चे उपविजेता, मागील ४१ दिवस रुग्णालयात दाखल, त्यांच्या जाण्याने चाहात्यांन मध्ये दुखाचे सावट

  दि. २१ :- ऑटो रिक्षा चालवणे पासुन ते चित्रपट मध्ये काम करने पर्यतचा सफर करणाला कानपुर येथे जन्म झालेला कॉमेडीचा बादशाह अशी ओळख असणारे राजू श्रीवास्तव यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी राजू श्रीवास्तव यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

व्यायाम करत असताना १० ऑगस्ट रोजी ते ट्रेड मिलवर कोसळले. त्यानंतर तत्काळ त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. प्रकृती गंभीर असल्यामुळे एम्स रुग्णालयातील आयसीयू विभागात त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. गेल्या महिन्याभरापासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती. आता त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.राजू श्रीवास्तव यांची ओळख म्हणजे विनोदी कलाकार अशी होती. राजू श्रीवास्तव हे ‘बिग बॉस’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’, ‘शक्तिमान’ आणि ‘द कपिल शर्मा शो’ याचा मालिकांचा भाग राहिले होते. त्यांनी ‘बाजीगर’, ‘मैने प्यार किया’, ‘बिग ब्रदर’, ‘मै प्रेम कि दिवानी हू’, ‘आये आठवा खदानी रुपया’, ‘बॉम्बे टू गोवा’ यासारख्या चित्रपटात भूमिका देखील केल्या होत्या. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या स्टँडअप कॉमेडी शोचे उपविजेते होते. तसेच त्यांचे गाजलेले ‘गजोधर भैया’ हे पात्र जबरदस्त गाजले होते.

•••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी संपर्क

{9767508972}

{7219500492}

{9750826349}

•••••••••••••••••••••••

YOUR REACTION?