देहूरोड शितळानगर मंदिर चौकात लोक शाहिर अण्णा भाऊ साठे भव्य दिव्य जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन.

देहूरोड दि. ०२ :

          लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी दीड दिवसाचे अल्प शिक्षण घेऊन त्यांच्या बुद्धिमत्तेचा जोरावर हाल अपेष्टा शोशत शिक्षण संपादन केले त्या जोरावर त्यानी साहित्यात क्रांती केली म्हणून विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर, लोक शाहीर अण्णा भाऊ साठे आपले आदर्श आहेत. या थोर पुरूषांची प्रेरणा घेऊन आपल्या पोटाला थोडीशी चिमटा घेऊन आपल्या मुलांना शिक्षण देऊन आदर्श भावी पिढी घडविणे हि आजच्या काळाची गरज आहे हिच अण्णा भाऊ साठे यांना खरी श्रद्धांजली ठरेल असे प्रबोधनात्मक मार्गदर्शन देहूरोड शहरातील विविध महत्त्व पुर्ण समाजाभिमुख योजनांचे शिल्पकार राजाराम दादा अस्वरे यांनी येथे केले. 


देहूरोड शितळानगर चौकात आयोजित लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव कार्यक्रमात राजाराम दादा अस्वरे बोलत होते. प्रारंभी लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेला देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील व राजाराम दादा अस्वरे यांच्या हस्ते पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. या वेळी उपस्थित आंबेडकरी चळवळीतील मान्यवर नेते के.एच.सुर्यवंशी, प्रकाश कांबळे, परशुराम दोडमणी, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, संजय धुतडमल या मान्यवरांनी पुष्प वाहुन अभिवादन केले. या जंयती महोस्तवाचे संयोजन आयोजन राजाराम दादा अस्वरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा उद्योजक नितीन गायकवाड, यांनी केले. पोलीस पाटील संदीप थोरात, शशिकांत सप्पागुरू, मनोज सरोदे, रोहित सरोदे ,पांडुरंग अवघडे, शशिकांत अवघडे, रंगन्ना राजले, कृष्णा राजले, अनिल शेट्टी, बाळासाहेब पिंजण, युवा नेते कुद्दूस खान, गजानन अडागळे, नारायण खंडागळे, दीपक पाटोळे, प्रशांत कांबळे, अरबाज खान, भीमराव जगले, सुनील थोरात, कैलास थोरात, प्रवीण शिंदे,राज तावरे, यांनी केले. या वेळी के.एच.सुर्यवंशी, प्रकाश कांबळे यांनी आपले विचार मांडले. तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील यांनी जंयती च्या शुभेच्छा दिल्या. 


 या वेळी उपस्थित महिलांनी वर्षाराणी पाटील यांचा सन्मान केला. राजाराम दादा अस्वरे यांच्या हस्ते केक कापुन उपस्थितीतांनी एक मेकांना भरवून आनंद व्यक्त केला. शितळानगर क्र १ येथील लोक शाहिर अण्णा भाऊ साठे युवा सेना या संघटनेच्या आयोजित कार्यक्रमात राजाराम दादा अस्वरे, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, झोपडी सुरक्षा महासंघाच्या नेत्या शशिकला अवघडे, पोलीस पाटील संदीप थोरात यांच्या संयुक्त हस्ते लोक शाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प माला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन तानाजी गायकवाड, विशाल जाधव, योगेश द्रविड, गणेश अवघडे, गनी कुचेकर, महेश मायुर, नागेश अवघडे, सागर अवघडे,चेतन तुपे, किशोर मोरे, सुजल जाधव, किशोर मोरे, दुर्गेश मोरे, सायल पवार, लखन अवघडे, अदित्य यादव, वैभव अरडे, भास्कर नायडू यांनी केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations