महापालिकेने या अगोदर १ हजार ३०५ सुरक्षा रक्षकांची केली होती नियुक्ती, महाराष्ट्र शासनाचे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे सुरक्षा रक्षक न घेता ठेकेदाराचे रखवालदार नियुक्त.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

द जस्ट आज वृत्त दि. ३०:- क्षेत्रीय कार्यालय, उद्यान विभाग आणि पाणीपुरवठा विभागाकडून सुरक्षारक्षक मदतनीस नेमण्याची मागणी क्षेत्रीय कार्यालय, उद्यान विभाग पाणीपुरवठा कार्यालय ने केली होती. या बाबत सुरक्षा विभागाने आयुक्तांकडे १७ ऑगस्टला प्रस्ताव दिला होता. अ आणि फ क्षेत्रीय कार्यालयासाठी ३, ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयासाठी १०, क आणि ई क्षेत्रीय कार्यालयासाठी १९ आणि ड आणि ह क्षेत्रीय कार्यालयासाठी १५ असे एकूण ४७ रखवालदार मदतनीस २८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत नेमण्यात येणार आहे. या सुरक्षा रक्षकांना महाराष्ट्र शासनाचे पुणे जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ प्रमाणे अटी नियमानुसार त्यांना मूळ वेतन ११ हजार ५०० आणि महागाई भत्ता ७ हजार ७० असे १८ हजार ५७० मासिक वेतन दिले जाणार आहे. 

मालमत्ता, उद्यान आणि जलकुंभाच्या सुरक्षेसाठी क्षेत्रीय कार्यालयनिहाय साठी महापालिकेने एकूण १ हजार ३०५ रखवालदार मदतनीस कंत्राटी पद्धतीने नेमले आहेत. या सुरक्षा रक्षक कर्मचारी पुरवठ्याचे काम चार ठेकेदारांना दिलेले आहे एम. के. फॅसिलिटीज सर्व्हिसेस, नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसेस, सैनिक इंटेलिजन्स अॅण्ड सिक्युरिटी आणि क्रिस्टल इंटेग्रेटेड सर्व्हिसेस या एजन्सींना देण्यात आले आहे.

••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations