आई सुलोचना आवारे यांच्या कडून आरोपींना फाशी शिक्षाचे मागणी, तर पत्नी आवारे यांची तपास विषेश पथकाकडे सोपविण्याची मागणी.

         

द जस्ट आज वृत्त दि. १६ - जनसेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष सोमाटणे टोलनाका हटाव कृती समितीचे प्रमुख व प्रसिद्ध उद्योजक किशोर आवारे यांची दिनांक १२ मे रोजी निघृण पणे नगरपरिषदेच्या आवारात हत्या झाली होती. या प्रकरणामुळे मावळ सहीत पुणे जिल्हात खळबळ उडाली होती आज पुणे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी किशोर आवारे यांच्या निवासस्थानी जाऊन किशोर आवारे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच किशोर आवारे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी किशोर आवारे यांच्या आई माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी “माझा मुलगा तळेगावकरांची प्राणपणाने सेवा करत होता. तळेगावकरांना न्याय पाहिजे. आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी,” अशी मागणी केली. तसेच या हत्या प्रकरणाचा तपास विशेष पथकाकडे सोपविण्याची मागणी किशोर आवारे यांच्या पत्नीने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली.

यावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्वांना धीर दिला. तसेच दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, भाजपा पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations