राणा दाम्पत्यांविरोधात १२४ अ कलम अनुसार राजद्रोहाचा गुन्हा दाखल, जामिनावर तातडीने सुनावणी साठी न्यायालयाचा नकार.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 मुंबई दि. २४ :-  गेल्या अनेक दिवसा पासुन कधी मस्जिद वर भोंगे तर कधी हनुमान चालीसा पठण तर कधी आक्षेपार्ह भाषण करून राजकिय वातावरण घडुळ करून जातीयवादी तेढ निर्माण होऊन कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करून हायवोल्टेज ड्रामा करुन आक्षेपार्ह वक्तव्यानंतर पोलीस अटकेत असलेले रवी राणा आणि नवनीत राणा यांना आज न्यायालायात हजर करण्यात आले होते. आज सुनावणीनंतर राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


आक्षेपार्ह वक्तव्य आणि समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदार रवी राणा आणि खासदार रवी राणा यांच्यावर आहे. सरकारी पक्षाच्या वतीने ॶॅड. प्रदीप घरत यांनी बाजू मांडली तर, राणा दाम्पत्याच्या वतीने ॶॅड. मर्चंट रिझवान यांनी बाजू मांडली.


राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केल्याचीही माहिती मिळतेय. परंतू जामिनावर तातडीने सुनावणी करण्यास वांद्रे कोर्टाने नकार दिला आहे. सरकारी पक्षाला २७ एप्रिलपर्यंत लेखी म्हणणे मांडायचे आहे. जामीन अर्जावर सुनावणी २९ एप्रिलला होणार असल्याचे कोर्टाने म्हटलंय. तोपर्यंत राणा दाम्पत्याचा मुक्काम कारागृहात असणार आहे. 


राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासन आणि मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य त्यांनी केले असे सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले.


जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी होणार असल्याने, आता राणा दाम्पत्याला २९ तारखेपर्यंत तुरूंगात राहावं लागणार आहे. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे. 

 बातमी व जाहीराती साठी🗣📲📞 {9767508972}  {9850826340} {7219500492}

YOUR REACTION?

Facebook Conversations