ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन संघटनेची दखल घेऊन प्रजासत्ताक दिनानिमित्त पाणीपुरवठा सुरळीत सोडले.
476
views

 देहुरोड दि. २७ :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने दर गुरुवारी पाणी बंद असते भारतीय प्रजासत्ताक दिन गुरुवारी येत असल्याने पाण्या वाचून खोळंबा होऊ नये म्हणून ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन संघटनेच्या वतीने मार्गदर्शक अशोक कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनच्या वतीने सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पाणी सुरळीत सोडण्याची निवेदनाद्वारे विनंती केली होती त्याची दखल घेऊन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित कुमार माने यांनी पाणी सुरळीत सोडून देहुरोडकरांना दिलासा दिला.या मुळे देहूरोड चे नागरिक मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने व संघटनेचे धन्यवाद मानत आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations