आधार कार्ड संबंधी उपलब्ध सेवा मध्ये विमासह नवीन आधार कार्ड , आधार कार्ड अपडेट, व सुकन्या योजनेचे निशुल्क लाभ घ्यावा :- दिनेश बालघरे.

 देहूरोड दि. १३:- समाजिक उपक्रम राबवुन लोकांना अहोरात्र सेवा देणारे चिंचोलीचे निस्वार्थ समाज सेवक दिनेश बालघरे यांच्या वतीने आधार कार्ड सेवा संबंधी कॅम्प चे चिंचोली येथे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत आधार कार्ड सेेवा कॅम्प चे उदघाटन कार्य सम्राट मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती सुनिल शेळके सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष गणेश खांडगे, युवक काँग्रेस मावळ अध्यक्ष किशोर सातकर, देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष प्रविण झेंडे, शहर महिला अध्यक्षा अरूणाताई पिंजण, युवक काँग्रेस शहराध्यक्ष अशिष बंसल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिंचोली अध्यक्ष मनोहर तात्या जाधव यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे.

 दिनांक १४ मार्च ते १६ मार्च या तीन दिवसीय आधार कार्ड सेवा संबंधी कॅम्पचे आयोजन सामाजिक नेते व देहूरोड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस दिनेश नंदकुमार बालघरे व समस्त पदाधिकारी यांनी चिंचोली येथे आयोजित केले आहे. या आधार कार्ड संबधी सेवा मध्ये नवीन आधार कार्ड काढणे, आधार कार्ड अपडेट करणे, बाल आधार कार्ड वय वर्षे १ ते ५ , सुकन्या योजना जन्म ते १० वर्षे, या बरोबर टाटा आणि बजाज कंपनीचे विमा उतरविण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा मोफत लाभ घ्यावा असे आधार कार्ड सेवा संबंधी कॅम्प च्या वतीने सांगण्यात आले आहे

 "आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणारे कागदपत्र"

 १) पत्ता, लाईट बिल, बँक पासबुक ड्रायव्हिंग लायसन्स. २) जन्मतारीख जन्म दाखला, शाळेचा दाखला, पॅन कार्ड. ३) नावात बदल शाळेचा दाखला गॅजेट. ४) लग्नानंतर नावात बद्दल मॅरेज सर्टिफिकेट मुलीचे जुने आधार कार्ड पतीचे आधार कार्ड बँक पासबुक. ५) मोबाईल नंबर लिंक, आधार कार्ड ओरिजनल व फोन नंबर.

 नवीन आधार कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे.

 १) जन्माचा दाखला २) शाळेचा दाखला ३) आई-वडील आधार कार्ड ४) मोबाईल नंबर. "बाल आधार कार्ड साठी आवश्यक कागदपत्रे" १) ओरिजनल जन्म दाखला २) आई-वडील चा आधार कार्ड ३) मोबाईल नंबर. 

"विम्यासाठी आवश्यक कागदपत्रे" 

१) आधार कार्ड २) पॅन कार्ड ३) ईमेल ४) मोबाईल नंबर.

 "सुकन्या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे" 

१) जन्म दाखला २) आई किंवा वडिलांचे आधार कार्ड ३) आई किंवा वडिलांचे पॅन कार्ड ४) मुलींचे दोन फोटो ५) आई किंवा वडिलांचे दोन फोटो असे आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन या कॅम्प मध्ये उपस्थित राहून लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन राष्ट्रवादीचे देहूरोड शहर सरचिटणीस दिनेश बालघरे यांनी केली आहे. 

अधिक माहिती साठी ९८५०९४४१४९, ७७७३९०९९०९, ८२०८६१४९५१ या नंबरवर संपर्क साधावा.

YOUR REACTION?

Facebook Conversations