मावळ, ७० लाखांची खंडणी प्रकरणी बाबाराजे देशमुखला अटक.
५ एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट, तरी देखील २५ गुंठे चा व्यवहार, बेबडओव्हळ येथील गट नं १९६ चा प्रकार देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल

पिंपरी दि. १८:- आज काल जमीन खरेदी विक्री फ्लोटिंग सारखे व्यवसाय खूप जोरावर आहे अनेक लोक खरेदी विक्री व्यवहार करून अनेक सामाज माध्यमातून प्रसिद्ध झोतात असतात असेच प्रसिद्ध समाज माध्यमांवर सदैव प्रकाशझोतात असणार्‍या मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख ( वय वर्ष ३३, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला शिरगाव पोलिसांनी अटक केली आहे. बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द ७० लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून ५ लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका ४८ वर्षीय सिव्हील इंजिनियरने शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द भादंवि कलम ४०६, ४२०, ३८६, ३८७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हा सन २०१३ ते नोव्हेंबर २०२० दरम्यान वेळावेळी मावळ तालुक्यातील बेबडओव्हळ येथील गट नंबर १९६ मध्ये घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बाबाराजे देशमुखची गट नंबर १९६ मध्ये मौजे बेबडओव्हळ येथे असणारी ५ एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नाही याबाबत देशमुखला माहिती आहे. तरीदेखील त्याने त्या मिळकतीमधील २५ गुंठे जागेचा व्यवहार फिर्यादी सिव्हील इंजिनियरसोबत केला. 

त्याचा मोबदला म्हणून २५ लाख रूपये घेतले. त्या जागेचे फिर्यादीच्या नावाने खरेदीखत करून न देता व घेतलेले २५ लाख रूपये फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक केली.

सदरील जागेचे खरेदीखत करावयाचे असल्यास आणखी ७० लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांच्याकडे ७० लाखाच्या खंडणीची मागणी केली. पैसे न दिल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि ५ लाख रूपये खंडणी म्हणून घेतले.

शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे.

गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations