धम्मभुमी सामाजिक संघटनेच्या उपक्रमांतर्गत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा व विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्प उभारणी कार्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या धम्म सेविका सारिका अमोल नाईकनवरे यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान.

देहूरोड :

        माझ्या वाढ दिवसाच्या निमित्ताने आज सकाळ पासून ते आता पर्यंत माझ्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलात असेच या पुढे ही स्नेहीयांचे जिव्हाळा थोरांचे आशीर्वाद या पुढे ही सदोदित राहू द्या. अशा भावना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्षा व देहूरोड शहराचे शान असलेल्या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उभारणी कार्यात महत्त्व पुर्ण योगदान दिलेल्या धम्म सेविका सारिका अमोल नाईकनाईकनवरे अशा जिव्हाळ्याचा भावना व्यक्त केल्या.


         धम्मभुमी सामाजिक संस्थेच्या वतीने संस्थेच्या उपक्रमांतर्गत धम्म सेविका सारिका नाईकनवरे यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित सन्मान सोहळ्यात सन्मानाला उत्तर देतांना त्यांनी भावना व्यक्त केल्या. प्रारंभी सारिका नाईकनवरे यांनी डाॅ बाबासाहेब आंबेडकर संविधान प्रदान प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. भारतीय. जनता पक्षाचे महिला देहूरोड शहराध्यक्षा सारिका मुथा, जेष्ठ धम्म सेविका पुष्पा सोनवणे, यांच्या हस्ते सारिका नाईकनवरे यांचा पंचशील उपरणे व शाल ,पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला.

         धम्मभुमी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के.एच.सुर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकात उपस्थितांचे स्वागत करून सर्वांना आपलेसे करून सर्वांना बरोबर घेऊन विकास साधणे असे सारिका नाईकनवरे यांचे व्यक्तीमत्व आहे. सारिका नाईकनवरे यांचे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्पा सह धम्म भूमी विकास कार्यात फार मोठे योगदान असल्याचे त्यांनी सांगून अशा कर्तृत्ववान व्यक्तीमत्व असलेल्या सारिका नाईकनवरे यांचा संस्थेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात येत आहे. असे त्यांनी सांगितले. जेष्ठ नेते राजाराम दादा अस्वरे यांनी सारिका नाईकनवरे यांनी आपल्या देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डात नगर सेविका ते उपाध्यक्ष पदाच्या कारकीर्दीत वाॅर्ड क्र. २ चा सर्वांगीण विकास घडवून सर्व समस्या कायम च्या सोडविल्या आहेत. समाज कार्य, धम्म कार्यात ही त्या आघाडी वर आहेत. अशा कार्यक्षम कर्तृत्व असलेल्या सारिका नाईकनवरे यांचा सन्मान होतो हा अभिमानास्पद आहे. अशा शब्दात दादांनी गौरव केला. धम्म प्रवक्ते प्रकाश कांबळे यांनी जाती साठी माती खाऊन सर्वांनी संघटीत होऊन जसे सारिका ताईंना देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड निवडणूकीत निवडुन आणले. त्याच प्रमाणे आगामी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणूकीत सारिका ताईंना पुन्हा व राजाराम दादा अस्वरे यांना सर्वानी संघटीत पणे एक दिलाने निवडून आणुन एक ईतिहास घडवावे असे आवाहन त्यांनी केले. या वेळी देहूरोड बुद्ध विहार विश्वस्त अॅड. अशोक रूपवते, वंचित आघाडीचे संघटन सचिव सुरेश भालेराव, सारिका मुथा, पुष्पा सोनवणे, यांनी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमात बुद्ध विहार विश्वस्त रोहन गायकवाड , जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, धम्मपाल कांबळे, शिल्पकार संजय शेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations