धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेडकरी चळवळीतील परशुराम दोडमणी तुळशीराम गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त सन्मान.
460
views

वृत्त संपादक अशोक कांबळे. सह प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

देहूरोड दि. २५ :- माझ्या वाढ दिवसाच्या निमित्त मला दुसऱ्यांदा सन्मान करून मला भावी कार्याला प्रेरणा व ऊर्जा देण्याचा प्रेमाचा वर्षाव केला त्याबद्दल मी सर्वांचे ऋणी आहे असे मत आंबेडकर चळवळीतील व पीपल्स रिपब्लिकन पक्ष मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी यांनी येथे व्यक्त केले. धम्मभुमी देहुरोड सामाजिक संस्थेच्या वतीने आंबेडकर चळवळीतील संघर्षवादी नेते परशुराम दोडमणी व तुळशीराम गायकवाड यांच्या वाढ दिवसा निमित्त देहूरोडची शान विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शिल्पा समोर आयोजित सन्मान सोहळ्यात सन्मानाला उत्तर देताना परशुराम दोडमणी बोलत होते. 

प्रारंभी परशुराम दोडमणी व तुळशीराम गायकवाड यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाम फलकावरील भारतीय संविधान प्रतिमेला पुष्प माला अर्पण करून अभिवादन केले. धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे समन्वयक अमोल नाईक नवरे धम्मप्रवक्ते प्रकाश कांबळे यांच्या हस्ते परशुराम दोडमणी यांना तसेच ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे मानवाधिकार संरक्षण संघटनेचे देहूरोड शहराध्यक्ष विजय पवार यांच्या हस्ते तुलसीराम गायकवाड यांना पंचशील उपरणे व पुष्पगुच्छ प्रदान करून सन्मान करण्यात आला. 

 धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेचे अध्यक्ष के. एच. सूर्यवंशी यांनी आपल्या प्रस्ताविकेत उपस्थितांचे स्वागत करून संस्थेच्या उपक्रमाद्वारे डॉ. आंबेडकर चळवळीतील संघर्षवादी नेते परशुराम दोडमणी व प्रसिद्ध भीम गायक तुळशीराम गायकवाड यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने सन्मान करीत असल्याचे सांगितले खरे आपण सर्वजण भाग्यवान आहोत देहूरोड शहराचा शान असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार शिल्पा समोरचा कार्यक्रम होतो आयोजक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या वाढदिवसानिमित्त सन्मान सोहळा करत असतात खरोखरच महान स्तुत्य कार्यक्रम आहे असा शब्दात संस्थेच्या गौरव करून संघर्षवादी नेते परशुराम दोडमणी, तुळशीराम गायकवाड यांना शुभेच्छा दिल्या. 

धम्म प्रवक्ते प्रकाश कांबळे यांनी आंबेडकर चळवळीतील संघर्षवादी नेते परशुराम दोडमणी अडी अडचणीतील लोकांच्या समस्या सोडविण्यात अहोरात्र झटत असतात प्रसंगी कोणी संकटात सापडल्यास त्यांच्या मदतीला धावून जातात. असा संघर्षवादी धम्मभूमी देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहार च्या पायाभरणी विकास कार्यात त्यांचे फार मोठे योगदान असल्याचे सांगून त्यांनी दोन्ही सन्मान मूर्तींना शुभेच्छा दिल्या .

या वेळी राष्ट्रवादी पक्षाचे असंघटित कामगारांचे नेते दीपक चौगुले यांनी आपल्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले परशुराम दोडमणी हे तळागाळातील गरीब लोकांन साठी झटणारा नेता आहे त्यांनी अनेक गोरगरिबांना आश्रय देऊन त्यांना घर निवारा देण्याचे मानवतावादी काम केले . तसेच त्यांना नोकरी देऊन उपजीविका भागविण्याचे कार्य ही परशुराम दोडमणी यांनी केले. पक्ष वाढी साठी अहोरात्र काम केले व करीत आहेत. अशा तडफदार निर्भीड निपक्ष पणे काम करणारा हा मानवतावादी नेता आहे .असे गौरव संघटित कामगारांचे नेते दीपक चौगुले यांनी केले.

 युवा नेते अमोल नाईकनवरे, विजय पवार, अर्जुन विधाते, राहुल गायकवाड यांनी ही शुभेच्छा दिल्या. या वेळी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे यांनी आपल्या संघटनेच्या वतीने परशुराम दोडमणी यांना भावी कार्या साठी शुभेच्छा दिल्या. 

 या वेळी भिमसिंग चलवादी, राष्ट्रवादी चे जेष्ठ नेते हिरामण साळुंके संदीप बहोत, राम कांबळे, गुरुकृपा वधू वर सूचक केंद्राचे संचालक बाळू संगटे, जोस्फीन सॅन्टेगो, जेष्ठ नेते इंद्रपालसिंग रत्तु, सुरेश गायकवाड, धर्मपाल कांबळे, गायकवाड,नरेश कांबळे,दुधेश्र्वर राम,रविंद्र चोपडे, राजु पंडित,राम प्रताप मोरे, गांधी गौसर, हनमंत राऊत,कयुंम शेख, प्रतिकुल गायकवाड,देवा धुमाळ,श्रीनिवास मिंनगी आदी मान्यवर उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations