सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही, फडणवीस यांच्या उध्दव ठाकरे यांना टोळा.

यंदाचे वर्ष निवडणुकीचे :- चंद्रकांत पाटील.

 

 पुणे दि. १६ :- राज्यातील मागील दीड वर्षा पासून प्रलंबित रखडलेल्या महापालिका निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होऊ शकतात असं महत्त्वाचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. पुणे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. गेल्या दीड वर्षापासून मुंबईसह राज्यातील महापालिकेच्या निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. त्याठिकाणी सध्या प्रशासक कामकाज पाहत आहेत.

राज्यातील महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे, असे संकेत देवेंद्र फडणवीस यांनी करुन पुणे महापालिकेवर पुन्हा भाजपचा झेंडा फडकेल, यात शंका नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार असताना त्यावेळी मोठा संघर्ष उभा राहिला. त्यावेळी पुणे शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम कौतुकास्पद आहे. कोरोनासोबत संघर्ष होताच, त्याबरोबर महावसुली सरकारसोबतही संघर्ष होता. यातून भ्रष्टाचारी सरकार विरोधात भाजपने काम केले. भाजपचा डीएनए संघर्षाचा असल्याचे सांगत सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलेलो नाही, असा टोला उद्धव ठाकरेंना लगावला.

कोरोना काळात भाजपने जगदीश मुळिक यांच्या नेतृत्वात खूप मोठं समाजकार्य केलं, लोकांना उपाशी झोपू दिलं नाही. सर्वतोपरी मतद केली, परंतु तत्कालिन सरकार त्याकाळीही कोविड सेंटरमध्ये भ्रष्टाचार करून मयतांच्या टाळूवरचं लोणी खाल्लं, असा आरोप फडणवीस यांनी केला.

मोदी सरकारला लवकरच नऊ वर्ष पूर्ण होणार आहेत. हे नऊ वर्ष भारताच्या विकासाचे वर्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगात आपली प्रतिमा तयार केली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला. पाकिस्तान आणि श्रीलंका यासह जगातील अनेक देशांत आर्थिक मंदी आहे. मात्र, भारतात मंदी नाही. गेल्या नऊ वर्षात भारत बदलले पाहायला मिळत आहे.

राज्यातील जनतेने २०१९ मध्ये भाजप-शिवसेना युतीला मतदान केले होते. मात्र, त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस -राष्ट्रवादीसोबत खुर्चीसाठी अभद्र युती केली. त्यानंतर अडीच वर्षे आम्ही संघर्ष केला. त्यावेळी अशा सरकारला घालवणे आवश्यक होते, ते आम्ही घालवत त्याचा अभिमान आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्याचा गतीने विकास होत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

खरंतर आपण युतीत लढलो होतो पण उद्धव ठाकरेंनी अभद्र युती केली म्हणून आम्हाला हे सरकार घालवावं लागलं.

खरंतर या लढाईत मी घरीही बसायला तयार होतो, पण आपल्या पक्षश्रेष्ठींनी मला सन्मानाने उपमुख्यमंत्रीपदावर बसवलं. हे आपलं सरकार आहे. पुणेकरांच्या भल्यासाठी ४० टक्के करसवलतीचा निर्णय आम्ही घेतला. एसटीमध्ये महिलांना ५० टक्के सवलत दिली. ओबीसी करिता १० लाख घरं बांधतोय, असंही फडणवीस म्हणाले.

कर्नाटकात झालेल्या पराभवावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले,कर्नाटकात भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. कर्नाटकात भाजपचे मतदान कमी झाले नाही,मात्र जनता दलाचे मतदान कमी झाले. त्याचा फायदा काँग्रेसला झाला, परंतु राज्यात शिवसेना ठाकरे गटआणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उड्या मारत आहेत. मात्र, पुन्हा एकदा केंद्रात आणि राज्यात आपलेच सरकार येणार आहे,त्यासाठी मोदी सरकारने केलेली कामे जनतेत जाऊन सांगा असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

यंदाचे वर्ष निवडणुकांचे – चंद्रकांत पाटील

चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदाचे वर्ष हे निवडणुकांचे आहे. मी काही भविष्यवाला नाही.

पण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर रांगेने महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती,

जिल्हा परिषद निवडणुका होती. न्यायालयाने काही नवी रचना मांडल्यास त्यानुसार कामकाज करुन नोव्हेंबर,डिसेंबरमध्ये निवडणुका होतील. त्यानंतर ज्या निवडणुका चुकत नाहीत, अशा लोकसभा निवडणुका मार्चमध्ये घोषित होऊन सहा टप्प्यात होतील. ती प्रक्रिया मे अखेरपर्यंत चालेल.

त्यानंतर चुकतच नाही अशी विधानसभा निवडणूक ऑक्टोबरमध्ये होईल.

त्यामुळे यंदाचे वर्ष निवडणुकांचे वर्ष असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. या निवडणुकीचे संकेता मुळे आता अनेक पक्ष जागृत होतील यात शंका नाही.

YOUR REACTION?

Facebook Conversations