आयटी तरूण तरूणी हे मद्य पिऊन दारू चालवित असल्याचे सिद्ध करण्याचा सरकारचा प्रयत्न :- माजी गृहमंत्री अनिल देशमुख.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 

पुणे दि. : कल्याणीनगर पोर्शे कार दुहेरी खून प्रकरणी मागिल महिन्याभरापासून पुण्यातील पोर्शे कार अपघात चर्चेत आहे अख्या देशात खळबळ माजविणारी घटना घडली यात दोन आयटी इंजिनियर मृत्यू झाले या प्रकरणात रोज नवीन खुलासे समोर येत आहे. अल्पवयीन मुलाने दारूच्या नशेत दुचाकीवरील दोघांना धडक दिली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नागरिकांनी अल्पवयीन मुलाला बेदम चोप देत अल्पवयीन मुलाला पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुलगा पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावयायिक विशाल अगरवाल याचा तो मुलगा आहे. हे जगप्रसिद्ध झाले आहे.

विशाल अगरवाल याचा मुलगा लवकर बाहेर यावा यासाठी मृतांनाच दोषी ठरवणार असल्याची सरकारची तयारी सुरु असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे परत एकदा या दुहेरी खून प्रकरणी खळबळ उडण्याची शक्यता आहे आधी अल्पवयीन आरोपीच्या मुलाचे रक्ताचे नमुने बदले आता मृतांच्या आतील शरीरातील भागाचे (व्हिसेरा) रिपोर्टमध्ये ही बदल करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप माजी गृहमंत्री देशमुख यांनी केला आहे.

अनिल देशमुख यांनी सोशल मिडीय प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर या संदर्भातील पोस्ट केली आहे. अनिल देसमुख आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले,हे उघड झाले आहे. त्याबद्दल तीन लाख रुपये लाच घेतल्याने ससुनच्या कर्मचारी देखील अटक आहे दोन पोलीस देखील निलंबित करण्यात आले आहे तसेच परिचारिका यांचे देखील चौकशी सुरू आहे आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या शरिरातील आतील भाग व्हिसेरा अहवाल मध्ये दारूचे प्रमाण सकारात्मक यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे.

जेणेकरुन या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरुण तरुणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा

अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अगरवालचा मुलगा लवकर सुटेल,

अशा पध्दतीने प्रयत्न सध्या सरु आहेत. असे खळबळजनक गौप्यस्फोट माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. याबाबत किती पारदर्शकता पणे यंत्रणा काम बघत आहे या कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations