देहूरोड इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लब च्या बक्षीस वितरण समारंभात नवनियुक्त अध्यक्ष राजाराम दादा अस्वरे व पदाधिकारी यांचा सन्मान

 देहूरोड दि. १८ :- क्रीडा क्षेत्रात क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आयोजन नियोजन करण्यात सर्वत्र ख्यातनाम असलेल्या देहूरोड इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्टस् क्लब च्या अध्यक्षपदी राजाराम दादा अस्वरे यांची उपाध्यक्षपदी प्रसिद्ध उद्योजक प्रसाद दादा लिम्हण, संभाजी थेऊरकर, कार्याध्यक्षपदी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, सचिवपदी भुपेंद्र पटेल, खजिनदार पदी विनोद नायर या मान्यवरांची नियुक्ती 

देहूरोड इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबचे मावळते अध्यक्ष अमोल व्यवहारे यांनी नुकत्याच झालेल्या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात जाहिर करून मान्यवरांचा सन्मान केला. राजाराम दादा अस्वरे लष्करी अभियंता विभागात तंत्र अधिकारी पदावर ४० वर्षे देश सेवा करून सेवा निवृत्त झाले. ते बांधकाम व्यावसायिक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. 

देहूरोड धम्मभुमी ऐतिहासिक बुद्ध विहाराच्या पाया भरणी व विकास कार्य नियोजनात ‌त्यांचे फार कृतीशील योगदान आहे. राजाराम दादा धम्मभुमी देहूरोड सामाजिक संस्थेचे कार्याध्यक्ष, आहेत.संस्थेच्या माध्यमातून देहूरोड बाजार पेठेच्या मुख्य चौकात विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर उभारण्यात आलेल्या विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महा प्रवेशद्वार शील्प कार्यातही त्यांचे म्हत्वाचे योगदान आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रमांत त्याचा सहभाग असतो यांच्यासह राजाराम दादा अस्वरे  विविध संस्थेत कार्यरत आहेत.

 देहूरोड इलेव्हन चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या अध्यक्षपदी राजाराम दादा अस्वरे यांच्या नियुक्तीचे संघटनेला आणखी बळ मिळाले आहे. त्या मुळे त्यांच्या निवडीने सर्वत्र आनंदाचे वातावरण असुन राजाराम दादा अस्वरे यांच्या वर अभिनंदनाचा, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे.

बातमी व जाहीराती साठीसंपर्क. ९७६७८९५०७२/७२१९५००४९२

राॅयल मेन्स वेअर देहूरोड. (रेडिमेड दालन.)

राॅयल मेन्स वेअर देहूरोड. (रेडिमेड दालन.)

YOUR REACTION?

Facebook Conversations