स्पर्धेत देहूरोड मामूर्डी माई बाल भवन संस्थेच्या खेळाडूंच वर्चस्व,जपानशी कडवी झुंज माई बाल भवनच्या राष्ट्रीय खेळाडू दिपाली कांबळे स्पर्धेच्या कर्णधार,वर्ल्ड कप साठी भारतीय संघ पात्र.

पुणे :

                युनायटेड स्पोर्ट्स सेन्टर कक्करनाड, या कोची केरळात ११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान IBSA ब्लाइंड फुटबॉल आशिया चॅम्पियन शीपचे आयोजन केले होते. आयोजक इंडिया आणि जपान या दोन दोन संघात अंत्यत चुरशीचे सामने झाले. दोन्ही सामन्यात जपानने भारतावर मात केली तरी या स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाच्या जोरावर भारतीय संघ २०२३ साली बर्लिंगम, इंग्लंड येथे होणाऱ्या महिला वर्ल्डकप साठी पात्र ठरला. 


भारतीय संघाची कर्णधार दिपाली कांबळे हिच्या नेतृत्वात खेळताना सुरवातीस लय हरवलेल्या संघाने नंतर मात्र आत्मविश्वासाने उत्तम खेळ करत जपान संघाला कडवी झुंज दिली. या स्पर्धेत कोमल गायकवाड, भाग्यश्री रूग्गी आणि दिपाली कांबळे यांना फेर प्ले अवॉर्ड मिळाला. जपानच्या किकी सुमारो, स्वरा हिला स्पर्धेतील उत्तम खेळाडू अवॉर्ड मिळाला. भारतीय संघाचे प्रशिक्षक सुनील म्यॅथु यांनी संघाच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला. 

दिपाली कांबळे, कर्णधार (महाराष्ट्र)

कोमल गायकवाड (महाराष्ट्र)

भाग्यश्री रुग्गी (महाराष्ट्र) विक्रम सिंग यांनी गोल गाईड चे काम पहिले

YOUR REACTION?

Facebook Conversations