विश्वरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या१३१ व्या जंयती निमित्त १४ एप्रिलला धम्मभुमी ऐतिहासिक बुद्ध विहार ते विश्वरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर पुतळा धम्म रॅली चे आयोजन व समता सैनिक दला चे मानवंदना कार्यक्रमाचे आयोजन

देहूरोड

    भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहर शाखा समता सैनिक दल,बुद्ध विहार ट्रस्ट आणि महिला वार्ड शाखा यांच्या वतीने भारतीय संविधानाचे शिल्पकार,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमीत्त एैतिहासिक बुद्ध विहार ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा या दरम्यान धम्म रँली व समता सैनिक दलाची मानवंदनेचा कार्यक्रम होणार आहे. तरी या आयोजित जंयती सोहळ्यात बौद्ध उपासक उपासिका यांनी सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार वाव्हे. असे अवाहन भारतीय बौद्ध महा सभा देहूरोड शहर शाखे चे अध्यक्ष व विश्वरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर जंयती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष संजय आगळे यांनी केले आहे. या आयोजित विश्वरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर जंयती सोहळ्याची अधिक माहिती देतांना संजय आगळे म्हणाले .१४ एप्रिल रोजी सकाळी ६.३० वा.धम्मभूमी ऐतिहासिक बुद्ध विहारात संस्कार विभाग प्रमुख बौद्धाचार्य राहुल बडेकर गुरूजी सुत्त पठन घेतील.सकाळी ७ वा. धम्म रॅलीचे प्रस्थान होईल.धम्म रॅली पुढे मार्गस्थ होऊन मुंबई पुणे महामार्गाने भारतरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर रूग्णालयातील विश्वरत्न डाॅ.बाबा साहेब आंबेडकर पुतळ्या समोर धम्म रॅलीचे सागंता होईल. तेथे उपस्थित आदर्शांचे व मान्यवंराचे हस्ते धुप.दिप.पुष्प पुजन। होईल. समता सैनिक दलाच्या वतीने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मानवंदना होईल. या वेळी समता सैनिक दलाचे लेफ्टनंन्ट जनरल पी.एस ढोबळे.मेजर सुरेश भालेराव.यांचे मार्गदर्शन होईल. भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष प्रकाश ओव्हाळ.पालक मंत्री मेजर विनोद कांबळे.भास्कर जावळ उपस्थित राहणार आहेत. धम्म रॅली चे नियोजन प्रमुख संरक्षण विभाग मेजर एम.डी.लोंढे.विभागीय अधिकारी प्रज्ञा आगळे.अजय जाधव .प्रमोद शेगोकार करणार आहेत. आयोजित जंयती सोहळ्याचे स्वागताध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर शाखा अध्यक्ष संजय आगळे आहेत. महिला वाॅर्ड शाखा अध्यक्ष आशाताई गायकवाड .बुद्ध विहार विश्वस्त सचिव अशोक रूपवते. ऊपस्थित राहणार आहेत. असे स्वागताध्यक्ष संजय आगळे यांनी माहिती देतांना दिली.


 या आयोजित भिम जंयती सोहळ्यात देहूरोड पंच क्रोशीतील बुद्ध विहार कार्यकारिणी,सभासद,मंडळे, राजकीय सामाजिक संस्था सर्वांनी सहभागी होऊन ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे . असे अवाहन स्वागताध्यक्ष संजय आगळे यांनी केले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations