श्री क्षेत्र देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा लाखो वारकरी भक्तांच्या उपस्थितीत मान्यवंराच्या हस्ते संपन्न.

देहूरोड दि.२१

          टाळ- मृदुंगाचा निनाद,साथीला शंख तुतारीचा गजर,प्रत्येक भाविक भक्ताच्या ओठावर ज्ञानबा तुकाराम चा घोष अशा उत्साहाच्या मांगल्याचे आणि संत तुकोबारायां वरील अफाट भक्तीचे दर्शन घडविणारा३३७ वा. पायी प्रस्थान सोहळा आज दुपारी श्रीक्षेत्र देहूच्या देऊळवाड्यात हजारो वारकरी भाविक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

 संपत्ती सोहळानावडे मनाला। लागला लळा पंढरीचा ।।जावे पंढरीशी ।आवडे मनाशी ॥कैक एकादशी ।आषाढीये॥ अशा अंभगाच्या ओवित संत तुकोबारायांनी पंढरीला जाण्याची ओढ आणि आषाढी वारीचे महत्व प्रकट केले आहे. या उत्कंठेने उद्या पंढरीच्या वारीला जाण्यासाठी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातुन श्री क्षेत्र देहूत लाखो वारकरी भाविक दाखल झाले आहेत. कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्ष पंढरीच्या वारीला जाता आले नाही.यंदा शासनाची परवानगी मिळाल्याने जेथे पाऊस पडला तेथे पेरण्या उरकुन जेथे पाऊस पडला नाही तेथील वारकरी भाविक संत तुकोबारायांवर भार ठेऊन पालखी सोहळ्यात आनंदात दाखल झाले आहेत.


पालखी सोहळ्यात सर्वच्या सर्व दिंड्या दाखल झाल्या आहेत. पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त पहाटे ५ वा.विठ्ठल रूक्माई महापुजा देहू देवस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे यांचे हस्ते झाली. सकाळी ६ वा.संत तुकाराम शिळा मंदिर महापुजा पालखी सोहळा प्रमुख ह.भ.प. माणिक महाराज मोरे, विशाल महाराज मोरे,संतोष महाराज मोरे यांच्या हस्ते झाली. सकाळी ७ वा. तपोनिधी नारायण महाराज समाधीची पुजा,वैकुंठ स्थान महापुजा देवस्थान चे अध्यक्ष नितीन महाराज मोरे व विश्वस्तांच्या हस्ते झाली. सकाळी १० ते१२ या वेळेत गेल्या सप्ताह भर चालेल्याअखंड हरि नाम सप्तहाची सांगता ह.भ.प.रामदास महाराज मोरे यांच्या काल्याच्या किर्तनाने झाली.

पाद्य पुजा --------------- यंदा सकाळी संत तुकोबारायांचे अजोळ घरी इनामदार वाडवाड्यात तुकोबारायांची पाद्य पुजा झाली.देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे ,पालखी सोहळा प्रमुख माणिक महाराज मोरे विश्वस्तांच्या हस्ते पाद्य पुजा झाली. तेथे बाहेर जय जय रामकृष्ण हरी संथ लयीच्या पार्श्वभुमीवर माऊली चा अंभग पांडुरंगाची,माऊली ची,तुकोबाची आरती झाली.पादुका उचलण्याचा मान असलेले मसलेकरांचा देवस्थानच्या वतीने मानपान झाला.मानपान होताच पुंडलिक वरदे हरि विठ्ठल या घोषात मसलेकर मंडळींनी वाजत गाजत पादुका हतात घेऊन त्या देऊळवाड्यात आणुन विठ्ठल रूक्माई ची भेट घडवुन पादुका पालखीत ठेवल्या.

 पालखी प्रस्थान --- -------- सोहळा -----------

दुपारी मुख्य पालखी प्रस्थान महापुजा उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार ,आमदार रोहित पवार, आमदार सुनिल शेळके त्यांच्या पत्नी सारिका शेळके,खासदार श्रीरंग आप्पा बारणे, जेष्ठ नेते उल्हास दादा पवार,पुजेचे मान मिळालेले नांदेड चे वारकरी गोंविद सखाराम गवनवार यांचे हस्ते झाली. देवस्थान च्या वतीने स्नमाननिय अतिथींचा सत्कार झाला. त्या नंतर फडकरी ,वारकरी,मानकरी, सेवेकरी इ.मान पान करण्यात आला. मान पान संपत असतानाच प्रस्थानाचा शंख ध्वनी ,नगारा,ताशाचा ध्वनी दुमदूमला आणि पालखी उचलण्याचा मान असलेले देहू माळवाडी चे टिळेकर मंडळींनी आणि चवरी ढाळण्याची पंरपंरा पाळणारे कारके यांच्या सह पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम या नाम घोषात त्यांनी पालखी उचलली. टाळ मृदूगांने देऊळवाडा परिसर निनादात असतांना पुढे चांदीची अब्दागिरीवर छायेला छत्री,सजविलेल्या पालखीची देऊळवाड्या भोवती प्रदक्षिणा सुरू झाली. तेंव्हा भाविकाच्या भक्तीस उधान आले .ते टाळ मृदूगांच्या निनादात तल्लीन होऊन नाचु लागले. या वेळी पालखीतील पादुकांच्या दर्शना साठी भाविकांची स्पर्धा लागली. पालखी प्रदक्षिणा झाल्यावर पालखी वाजत गाजत अजोळ घरी इनामदार वाड्यात मुक्कामाला आली.

उद्या सकाळी ९वा. हवेली चे प्रांत संजय आसवले,अप्पर तहसिलदार गीता गायकवाड यांच्यासह शासकिय अधिकांर्यांच्या उपस्थितीत .जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांचे हस्ते पालखी ची शासकिय पुजा होईल. तेथुन पालखी खांद्यावर घेऊन छ.शिवाजी महाराज चौकात दाखल होईल.पालखी नगर पंचायती च्या कार्यालया समोर देहूच्या नगराध्यक्षा स्नेहा चव्हाण,उप नगराध्यक्षा सारिका काळोखे व त्याचे सहकारी पालखीचे स्वागत करतील. देहू मुख्य प्रवेश द्वारा जवळ सुवासनी कडुन पालखी रथा च्या बैल जोडी ची पुजा होऊन पालखी रथात ठेऊन देहूकरांचा निरोप घेऊन पुढे संत तुकोबारायांचे मुस्लिम भक्त अनगडशाहवली बाबा दर्ग्या जवळ पालखी रथातुन तळावर ठेऊन तेथे अंभग आरती होईल. पालखी पुन्हा रथात ठेवले जाईल.तेथुन पुढे मार्गस्थ होऊन पालखी सोहळा स्वागत स्विकारीत दुपारी चिंचीली पादुका विसावा मंदिरा जवळ पोहचल्यावर तेथे रथावरील चोपदाराने चोप फिरवताच अंभगाची सुरवात होईल.चोप उंचवल्यावर अंभगाची सांगता,आरती होईल. तेथे पालखी सोहळा काही काळ विसावा घेऊन देहूरोड कडे मार्गस्थ होईल. पुढे देहू फाट्यावर देहूरोड करांचा स्वागत स्विकारून पुढे निगडी पिंपरी चिंचवड महानगरी कडे मार्गस्थ होईल.

YOUR REACTION?

Facebook Conversations