किशोर आवारे खुनी हल्याने प्रचंड खळबळ, तळेगाव मध्ये तणावाचे वातावरण, घटनास्थळी पोलीसांची धाव, पोलीस हल्लेखोरांचे शोध घेत आहेत

मावळ दि. १२ :- माळव तालुक्यातील उद्योगपती व तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे  यांच्यावर शुक्रवारी दिनांक १२रोजी भरदिवसा जिवघेणा हल्ला करण्यात आला. किशोर आवारे यांच्यावर  गोळीबार करून कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या किशोर आवारे यांना तातडीने सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास तळेगाव नगरपरिषदेच्या  कार्यालयासमोर घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्यधिकारी यांची भेट घेऊन खाली आले. त्यावेळी धबाधरून बसलेले चार हल्लेखोरांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. दोघांनी गोळीबार केला तर इतर दोघांनी त्यांच्यावर कोयत्याने वार केले. किशोर आवारे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतरही हल्लेखोर काहीवेळ त्याच ठिकाणी थांबले होते. जखमी अवस्थेत आवारे यांना सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. 

जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगाव शहरात विविध सामाजिक उपक्रमांद्वारे त्यांची समाजाशी

नाळ जोडली होती. किशोर आवारे सहा वर्षापूर्वी झालेल्या तळेगाव नगरपरिषद निवडणुकीत जनसेवा विकास समितीचे

नगरसेवक म्हणून निवडून आले होते. किशोर आवारे यांच्या प्राणघात हल्ला झाल्याची घटना समजताच

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी

घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे तळेगाव शहरात तणावाचे वातावरण आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. किशोर आवारेंचा गोळीबार करून खून झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations