अमेरिका वरून गिफ्ट पाठविल्याचे सांगत १ लाख ४८ हजारची फसवणूक महिला विरूध्द तक्रार दाखल.

 

देहूरोड दि. ०७ :-  लग्न जुळत नाही चांगले वर-वधु मिळावा आपला जीवनसाथी मना सारखाच असावा असे लग्न जुळत नसलेले अनेक तरूण तरुणींना व परिवारातील सदस्यांना ही वाटत असतो पण असे लग्न जुळविण्यासाठी अनेक  माध्यमातून अनेक वेबसाईटवर आहे, पण आज काल या वेबसाईटवर फसवणूक चे अनेक प्रकार समोर येत आहे असेच प्रकार जीवनसाथी या मॅट्रीमोनिअल साईटवर ओळख झालेल्या व्यक्तीने अमेरिकेतून गिफ्ट पाठवल्याचे सांगितले.ते गिफ्ट दिल्ली विमानतळावर कस्टममध्ये आले असून तिथून सोडविण्यासाठी पैशांची मागणी करत पावणे दोन लाखांहून अधिक रुपये घेत तरूणीचे फसवणूक केली आहे

देहूरोड येथील तरुणीने देहूरोड पोलीस ठाण्यात या फसवणूक केल्याचे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी यश अग्रवाल, या महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीची यश अग्रवाल याच्यासोबत जीवनसाथी या वेडिंग साईटवर ओळख झाली होती. त्याने अमेरिकेतून गिफ्ट भारतात पाठवले असल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीला एका महिलेचा फोन आला. ती महिला दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोलत असल्याचे सांगत त्यांच्यासाठी अमेरिकेतून गिफ्ट आले असून त्यात महागड्या वस्तू असल्याने ते घेण्यासाठी कस्टम चार्ज भरावा लागेल असे सांगितले.फिर्यादीने कस्टम चार्जच्या नावाखाली नाजीर अहमद नावाने असलेल्या बँक खात्यात ३८ हजार ५०० रुपये पाठवले. काही वेळाने तरुणीला पुन्हा फोन आला. त्या गिफ्टमध्ये २० हजार अमेरिकन डॉलर आहेत, त्यामुळे त्याचे सिक्युरिटी डिपॉझिट म्हणून १ लाख ४८ हजार रुपये भरावे लागतील, असे सांगितले. फिर्यादींनी ते पैसे सैफ खान या नावाने असलेल्या खात्यात दोन टप्प्यात भरले. पैसे घेऊन तरुणीला गिफ्ट न देता फसवणूक केली. काही दिवस तरुणीने गिफ्ट येण्याची वाट पाहिली. मात्र गिफ्ट न आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली व त्या महिला च्या विरुद्ध तक्रार दाखल केले या बाबत देहूरोड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations