जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटनस्थळ घोषित करण्याचा निषेधार्थ संपूर्ण भारत बंद, प्रस्ताव मागे घ्या अन्यथा टप्याटप्याने अंदोलन करण्याचा इशारा.

द जस्ट आज न्युज दि. 21:-  जैन समाजाचे पवित्र स्थान असलेल्या सिद्धक्षेत्र झारखंड राज्य सरकारने जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून केद्र सरकारच्या वन मंत्रालयाने पर्यटन स्थळ म्हणुन घोषित केले. राज्य सरकारच्या या निर्णयाचा जैन समाजाने विरोध केला आहे. पर्यटन स्थळ घोषित च्या  विरोधात संपूर्ण जैन समाजाने आज भारत बंदची घोषणा केली आहे. या भारत बंदला पुण्यातील जैन समाज बांधवांनी पाठींबा दिला असून आज सर्व जैन बांधव आपले दुकान, व्यवसाय बंद ठेऊन या निर्णयाचा निषेध नोंदवणार असल्याचे श्री गोडवाड संघाचे अध्यक्ष फतेचंद रांका आणि सचिव गणपत मेहता यांनी आवाहन केले आहे.

  झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेले श्री सम्मेत शिखरजी ठिकाण स्थित आहे. या तीर्थक्षेत्राचे पर्यटन स्थळात रूपांतर करण्यास जैन समाजाचा अनेक दिवसांपासून विरोध आहे. पर्यटन स्थळे आणि वन्यजीव अभयारण्य यासारख्या गोष्टी करण्यासाठी सरकारने जारी केलेली अधिसूचना धार्मिक श्रद्धा दुखावणारी आहे. कोणताही सुसंस्कृत समाज अशा योजना स्वीकारणार नाही. सरकारने सम्मेत शिखरजीसह देशातील सर्व धार्मिक स्थळे पवित्र स्थळे म्हणून घोषित करून तेथे दारू, मांसाहार व इतर व्यसनांवर बंदी घालावी. पवित्र स्थळाला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करणे चुकीचे असून सम्मेत शिखरजीला पर्यटन स्थळ करण्याचा  प्रस्ताव मागे घ्यावा, अन्यथा टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जैन समाजाच्यावतीने देण्यात आले आहे. 

YOUR REACTION?

Facebook Conversations