देशाच्या प्रत्येक राज्यात विविध उपक्रम राबवुन मानव अधिकार दिवस साजरा.

 

 पुणे दि.१०:- जागतिक राष्ट्रीय मानव अधिकार दिवसानिमित्त देशाच्या विविध राज्यात ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने मानव अधिकार दिवस साजरा करण्यात आला. ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन च्या वतीने आप आपल्या कार्यालयात तसेच विविध राज्यात मानव अधिकार साजरा करण्यात आले. महाराष्ट्र मध्ये जाति पंथ धर्म, गोत्र आदीचे भेदभाव न करता मानव अधिकारच्या प्रति सजगता आणण्यासाठी ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली तथा महाराष्ट्र राज्यचे राज्यध्याक्ष हनीफ डफेदार यांच्या नेतृत्वाखाली अनेक शाळे मध्ये मानव अधिकार बाबत जनजागृती करत शिक्षणाचे महत्त्व सांगण्यात आले या कार्यक्रमाला सफल करण्यासाठी पुणे जिल्हा अध्यक्ष इम्तियाझ शेख अमीर अत्तार व पुणे जनरल सेक्रेटरी चंद्रशेखर पात्रे यांनी परिश्रम घेतले.

फलटण:- येथे ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष इम्तियाज शेख यांनी मदसा मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थी यांना मानव अधिकार बाबत माहिती दिली तसेच शिक्षण किती गरजेचे आहे या बाबत ही माहिती दिली. या वेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर यांनी मदसा मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थीना मानव अधिकार च्या बाबत बोलताना म्हणाले आज आपण या मदसा मध्ये शिक्षण घेत आहेत येथे काही अनाथ विद्यार्थी देखील आहे तर काहीचे पालक देखील आहे. पण शिक्षण घेताना आपण सर्वांनी सामाजाचा भान ठेवून शिक्षण घेतले पाहिजे व पुढे देश सेवा ही केले पाहिजे ते सेवा कुठल्याही प्रकारची असो ती सेवा असते आपले आई वडील खूप परिश्रम घेऊन तुम्हाला शिक्षण देत आहेत ते परिश्रम वाया जाता काम नाही, शिक्षण घेतल्यानंतर आपले अधिकार काय असतात हे माहीत होणे आवश्यक आहे या वेळी मदसाचे सर्व पदाधिकारी व शिक्षकगंण उपस्थित होते

 सातारा येथे वृक्षारोपण करत प्रकृतीचे संवर्धन केले या वेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अबुबकर शेख, शाहरुख पटेल, मुस्तफा सुतार, बिलाल सुतार इत्यादी नी उपक्रम राबविले. कर्नाटकात ह्युमन राईट्स असोसिएशन मार्फत वैद्यकीय चिकित्सा शिबीर राबविण्यात आले या शिबीराचे राष्ट्रीय समन्वयक मुन्ना बख्शी तथा राज्याध्यक्ष दादापीर बाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम राबविण्यात आले.या कार्यक्रमात वार्ड क्रंमाक १९चे प्रतिनिधी पार्षद हैदर नदाफ, वार्ड क्रंमाक २० चे जे.जे. बांगी वार्ड क्रंमाक २८ चे केसर इनामदार आणि निगमचे उपायुक्त महावीर बोरांवर उपस्थित होते.या वेळी मोफत वैद्यकीय चिकित्सा शिबीर साठी मेक्स केअर रूग्णालयाचे डॉक्टर मुदस्सिर इंडिकर व सहकार्याने परिश्रम घेतले व मानवतावादी उपक्रम राबविले. 

 पश्चिम बंगाल येथे संघटनेच्या वतीने काही ठिकाणी शाळेय विद्यार्थ्यांना, नागरिकांना मार्गदर्शन करत संघटनेचे राष्ट्रीय सचिव फरीद इकबाल यांनी जनजागृती केली, मानव अधिकार चे माहीत देताना पश्चिम बंगालचे नवनियुक्त प्रदेश अध्यक्षा कविता गुप्ता यांनी मानव अधिकारची माहीत दिली व हिवाळी असल्याने अनेक ठिकाणी कुडकुडत असलेल्या गोर गरीब निराधर लोकांना मायेची उब देण्यासाठी उबदार चादर कपडे स्वेटर देण्यात आले या वेळी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुमेनदास गुप्ता, तिमिर बिस्वास, हाजी एस के अनवरअली, नजीफ अहमद, डॉ बिस्वास आणि मो. वकील यांनी विशेष परिश्रम घेतले. तसेच अनेक राज्यात ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशनचे अतिशय चांगले प्रकारे काम चालत असल्याने अनेक पदाधिकारी व सदस्याचे शाल श्रीफल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रीय अध्यक्ष मा. इंजी. वसीम अकरम

यावेळी सर्व मानव अधिकार योद्धांना ह्युमन राईट्स जस्टिस असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष मा. इंजी. वसीम अकरम मेव विडीओ काॅल वरुन बोलताना म्हणाले मानव अधिकारच्या रक्षणासाठी वेगवेगळ्या सामाजिक संघटना अस्तित्वात आले आहे पण हे संघटना खरच मानव अधिकार साठी लढत आहेत हे विषय खुपच गंभीर आहे, प्रत्येक क्षेत्रात मानव अधिकार चे पायमल्ली केले जात आहे. कमीत कमी मानव अधिकार दिनी सामाजिक रुपाने विचार केले पाहिजे तेव्हा शोषण, हुंडाबंदी, हीन भावना सहित जुन्या मानदंड आणि प्रथा पुर्णपणे थांबले पाहिजे तेव्हा खरा मानव अधिकार दिवस सार्थक होईल अशी भावना या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष यांनी व्यक्त केली व ह्युमन राईट्स असोसिएशन चे सर्व पदाधिकारी व सदस्यांना मानव अधिकार दिवसाचे हार्दिक शुभेच्छा दिल्या.

YOUR REACTION?

Facebook Conversations