हिंदू राष्ट्रसेना चे तुषार हंबीर हल्ला प्रकरणी तीन कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचारी निलंबित.
मोक्का अंतर्गत शिक्षा भोगत असणाऱ्या तुषार हंबीर वर ५ सप्टेबर रोजी जीवघेणा हल्ला झाला होता, व तो या हल्ल्यात वाचला होता पण या प्रकरणी तीन पोलीसांना निलंबित करण्यात आले

पुणे दि. २२:- दिनांक ५ सप्टेंबर रोजी ससुन रुग्णालयात हिंदुराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर वर जीवघेणा हल्ला झाला होता व तो या हल्ल्यात  थोडक्यात वाचला होता तुषार हंबीर चे नातेवाईक असल्याचे सांगत आरोपींनी त्याच्यापर्यंत पोहोचले होते व हंबीर वर जीवघेणा हल्ला केला यात हंबीर वाचला परंतु त्याच्या सुरक्षेसाठी नियुक्त असलेले पुणे पोलिस दलातील पांडुरंग कदम,राहुल माळी,सिताराम कोकाटे यांना कर्तव्यात कसूर म्हणून निलंबित करण्यात आले आहे.

हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात पुणे पोलिस गुन्हे शाखा पाचच्या पथकाला यश आले आहे. 

 कारागृहात शिक्षा भोगणाऱा तुषार हंबीर आजारी असल्याने कैद्याला उपचारासाठी ससून रुग्णालय मध्ये आणले असता ५ सप्टेंबर रोजी त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता. हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पाचच्या पथकाला यश मिळाले. 

हल्ला करणाऱे प्रकाश उर्फ वैष्णव रणछोडदास दिवाकर (वय २६ रा.उत्तमनगर, पुणे) व परवेज उर्फ साहिल हैदरअली इनामदार (वय २१ रा.उरुळी देवाची) अशी अटक आरोपींची नावे आहेत  त्यांनी ससुनमध्ये घुसून तुषार हंबीर या मोक्का अतंर्गत कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या कैद्यावर हल्ला केला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुषार हा देखील सराईत असून तो सध्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याची तब्यत थोडी खराब झाली म्हणून पोलीस त्याला उफचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात घेऊन आले होते. यावेळी प्रकाश दिवाकर, बालाजी ओव्हाळ, सागर ओव्हाळ, नोन्या उर्फ प्रतिक कांबळे, ऋतिक उर्फ बबलु राजू गायकवाड, साहिल इनामदार इ. यांनी जिवे मारण्याचा हेतून हल्ला केला होता. त्यानुसार पोलीस या आरोपींच्या मागावरच होते. दरम्यान गुन्हे शाखा पाचचे पोलीस अमंलदार यांना माहिती मिळाली की, पाहिजे असलेला आरोपी दिवाकर व इनामदार हे हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली, त्यानुसार पोलिसांना सापळा रचून आरोपींना अटक केले. पोलिसांनी आरोंपीना बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

तसेच यातील मुख्य सुत्रधार नोन्या संजय वाघमारे (वय २२ रा. हडपसर) व त्याचा साथीदार ऋतिक उर्फ बबलु राजू गायकवाड (वय १९ रा. हडपसर) यांना गुन्हे शाखा युनिट पाच यांनी अटक केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

•••••••••••••••••••••••

बातमी व अन्य जाहीराती साठी संपर्क.

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••

YOUR REACTION?