ग्राहकांची फसवणूक होऊ नये यासाठी पुणे वैध मापन शास्त्र तर्फे लोकांना आवाहन.
कुठल्याही आस्थापनाने फसवणूक केल्यास त्यांच्या विरोधात नागरिकांनी खाली दिलेल्या नियंत्रण कक्षा कडे तक्रारी दाखल करावा:- उप नियंत्रण वैध मापन शास्त्र पुणे.

पुणे दि. २० :- रेशन दुकान दार पेट्रोल पंप व किराणा माल असे विविध दुकानदार हे नेहमी चालाकिने ग्राहकांची लुबाडणूक करून ग्राहकांची नेहमी फसवणूक करत असतात असे दुकान मालकांवर आता वैध मापन शास्त्र यंत्रणे पुणे तर्फे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे वस्तूंचे वितरण करताना वजन व माप संदर्भातील नियमांचे पालन न करणाऱ्या आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या अस्थापनांविरोधात तक्रार करण्याचे आवाहन वैध मापन शास्त्र यंत्रणे पुणे तर्फे करण्यात आले आहे.

उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे कार्यालयामार्फत वेळोवेळी विविध मोहिमांचे आयोजन करून वजन व माप यांची विहीत मुदतीत फेरपडताळणी व मुद्रांकन न करणाऱ्या तसेच आवेष्टित वस्तू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर नियमानुसार कारवाई केली जाते.

पेट्रोल मापात कमी देणे, आवेष्टित वस्तूवरील मूळ छापील किंमतीत खाडाखोड करणे, त्यावर नवीन छापील किंमतीपेक्षा जादा दराने विक्री करणे, गॅस सिलेंडर वितरीत करणाऱ्या वितरक प्रतिनिधीकडे वजन काटा उपलब्ध नसणे अशा पद्धतीचे उल्लंघन आढळल्यास या विभागाकडून कारवाई केली जाते.

आता दिवाळी दसरा क्रिसमस सण लागोपाठ येत आहेत म्हणून येणाऱ्या सण-उत्सवात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, याकरीता ग्राहकांनी नियमांचे उल्लंघन आढळून आल्यास वैध मापन शास्त्र यंत्रणेच्या नियंत्रक कक्ष संपर्क क्रमांक ०२२-२२६२२०२२/०२०-२६१३७११४ व्हॉटसअप क्रमांक ९८६९६९१६६६ या क्रमांकावर किंवा dclmms_complaints@yahoo.in या ईमेल पत्त्यावर संपर्क करून तक्रार नोंदवावी, असे आवाहन उप नियंत्रक वैध मापन शास्त्र पुणे जिल्हा यांनी केले आहे. आता प्रत्येक क्षेत्रातील मालकांनी नियमांचे पालन करून ग्राहकांना योग्य रितीने वस्तू वितरित करावा व ग्राहकांनी देखील या बाबत जागृत राहणे गरजेचे आहे. 

•••••••••••••••••••••••••••


बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞


{9767508972}

{7219500492}

{9850826340}

••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?