गहुंजे येथे सोसायटी मध्ये पार्क केलेल्या चारचाकी गाडी मधुन दोन लाख दहा हजार रुपये लंपास
अज्ञात चोरट्यांचा विरोधात गुन्हा दाखल, सोबत काम करीत असलेले तीन जणांवर संशय,

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

देहुरोड दि. १८ :– आज माणुस रात्र दिवस काम करून पैसे कमवितो पण चोरटे एका झटक्यात चोरी करून आपण कमवलेला पैसा क्षणार्धात घेऊन पसार होतात आज काल चोरीचे प्रमाण एवढे वाढले आहे चोर जोमात, आणि लोक कोमात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे अशीच घटना गहुंजे येथे सोसायटीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेल्या आलिशान कारमधून दोन लाख १० हजार रुपये रोकड चोरीला गेली. ही घटना शनिवारी दि. १७ रोजी सकाळी लोढा बेलमेंडो, गहुंजे येथे घडली. प्रवीणकुमार सुरेंद्रकुमार सिंग (वय वर्ष ४२, रा. लोढा बेलमेंडो, गहुंजे) यांनी याप्रकरणी शिरगाव परंदवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची आपली चारचाकी वाहन मर्सिडीज कार क्रमांक एमएच १४/जी.क्यू २१०७ या चारचाकी वाहन सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. त्यांनी कारमध्ये दोन लाख १० हजार रुपये रोख रक्कम ठेवली होती. शुक्रवारी रात्री साडेआठ ते शनिवारी सकाळी दहा च्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गाडीतून रोकड चोरून नेली. कार वॉश करणारा ऋषी झाडे, कार चालक अविनाश डांगी आणि विश्वनाथ कांबळे यांच्यावर फिर्यादींचा संशय आहे. शिरगाव परंदवडी पोलीस या बाबत अधिक तपास करीत आहेत.

•••••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?