तीस ते चाळीस वर्षे सेवा करून निवृत्त झालेल्या व कार्यरत कर्मचाराऱ्यांन साठी जनजागृती व मार्गदर्शन शिबीर , निवृत्त कर्मचारांऱ्यांचे उत्फुर्त प्रतिसाद. तर हिरामण साळुंके यांची देहुरोड राष्ट्रीय संघर्ष समिती अध्यक्ष पदी नियुक्ती.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहुरोड दि. १४ . ईपीएस ९५ या कायदेअंतर्गत अनेक वर्षांपासून विविध महामंडळ, खाजगी संस्था, सहकारी बँक, साखर कारखाने, उद्योग, गिरणी मध्ये काम करणारे महामंडळे , खाजगी वाहन उद्योग संस्था,सहकारी बॅंका ,साखर उद्योग, गिरणी, आय टी उद्योग, बीडी कामगार असे १८८ विविध क्षेत्रात काम करणारे कामगारांना त्यांचे पेंशन वाढ करण्या बाबत मावळ च्या इंदौरी मध्ये जनजागृती व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आला.  

विविध क्षेत्रातील १८८ विविध संस्थांन मध्ये मागील ३० ते ४० वर्ष सेवा करून निवृत्त झालेले व सध्या कार्यरत असलेल्या कर्मचार्यासाठी मावळ तालुका राष्ट्रीय संघर्ष समितेने पेन्शन वाढ या विषयी जनजागृती व संघर्ष तसेच संघटन विषयी सखोल मार्गदर्शन करण्यासाठी इंदौरी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी अनेक क्षेत्रातील काम करणारे निवृत्त व कार्यरत कामगार बहुसंख्येने उपस्थित होते. 

या वेळी संघटनेचे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष इंद्रसिंग राजपूत,पुणे कार्याध्यक्ष सी.एम.राऊत ,पुणे समन्वयक अजितकुमार घाडगे, पिंपरी-चिंचवड सल्लागार विजय राजपाठक, पिंपरी-चिंचवड उपाध्यक्ष तानाजी (आण्णा) काळभोर, सचिव श्रीपाद चलवादी महिला उपाध्यक्षा पुनमताई गुजर, देहूरोड शहर कामगार सेलचे अध्यक्ष दिपक चौगुले व राष्ट्रवादी मावळ तालुका संघटक सचिव हिरामण साळुंखे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी अजित गाडगे, डाॅ.लताताई पुणे, सुभाषराव पोखरकर यांनी उपस्थित पेन्शन धारक नागरिकांना मोलाचे मार्गदर्शन केले.

या सभेचे आयोजन प्रभाकर कुलकर्णी ( जिल्हा उपाध्यक्ष), शंकर शेवकर,(मावळ तालुकाध्यक्ष ) राजाराम नाटक, नितीन भांबळ, सुरेश कुडे,दशरथ ढोरे, मनोहर बागेवाडी, दत्ता ढोरे,रमेश जाधव, सुधीरराव ढगे,नंदकुमार डांबे, केशव कोल्हापूरे, किसन तरस, मारूती चौगुले, कुमार कुलकर्णी, चंद्रमणी ठाकरे, पांडूरंग नाणेकर, प्रकाश मुत्तलगिरी, गोपीनाथ या पदाधिकाऱ्यांनी केले.

यावेळी EPS-95 राष्ट्रीय संघर्ष समितीच्या ( पेन्शन धारक) देहूरोड संघटने अध्यक्ष पदी हिरामण (मामा) साळुंखे यांची निवड करण्यात आली. 

या वेळी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते हिरामण साळुंके यांना निवडीची पत्र देण्यात आले या वेळी हिरामण साळुंके यांनी पुढील काळात संघटनेच्या माध्यमातून परिसरातील सर्व पेन्शन धारक नागरिकांना बरोबर घेऊन संघटनेचा विस्तार वाढून कामगारांना न्याय मिळून देण्यासाठी मी कटीबद्ध राहीन असे आपले मनोगत व्यक्त केले या वेळी जमलेले सर्व मान्यवरांनी हिरामण साळुंके यांना पुढील वाटचालीस सर्वानी शुभेच्छा दिल्या. 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शंकरराव शेवकर व इंद्रसिंग राजपूत यांनी केले तर उपस्थितांचे आभार तानाजी काळभोर यांनी मानले.

•••••••••••••••••••••••••••• द जस्ट आज वृत्तच्या बातमी पाहण्यासाठी आजच प्ले स्टोअर मधुन डाऊनलोड करा, व ताजी बातमी बघा. 

बातमी व जाहीराती साठी संपर्क. 

{9767508972}

{7219500492}

{9850726340}

•••••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations