मंगलमय धम्म वातावरणात धम्म सेवक श्रीमंत शिवशरण यांच्या निवासस्थानात वर्षावास सांगता धम्म कार्यक्रम संपन्न

देहूरोड :

         प्रथम धम्म कारणाला स्थान दिले पाहिजे. त्या नंतर राजकारण, समाजकारण पण तसे होत नाही. याची खंत वंदनीय भन्ते संघबोधी यांनी धम्म प्रवचनात व्यक्त केली.

विश्वभुषण डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा न पाळता अद्याप ही काही बौद्ध म्हणवणारे घरात हिंदू देव देवतांची पुजा करतात अशांना भन्तेनी शेणातल्या किंड्याचे उत्तम उदाहरण देत उपदेश देताना म्हणाले शेणातल्या किंड्यांनी मध चाखायचे ठरविले काही किंड्यांनी तोंडातून शेणाचा गोळा टाकून मध चाखले त्यांना गोड लागले काही नीट तोंडात शेणाचा गोळा तसाच ठेवून मध चाखायचा प्रयत्न केला पण त्यांना गोड काय लागेना यातुन ज्यानी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्माचे तंतोतंत पालन केले ते प्रज्ञावंत झाले. बौद्ध झाले पण अद्याप ही हिंदु देवतांची पुजा,कर्मकांड करतात अशांच्या तोंडात अद्याप ही तो शेणाचा गोळा तसाच आहे म्हणून ते तसे वागतात असा बोध भन्ते नी दिला.

तथागत भ. गौतम बुद्ध यांच्या उपदेशाचे आचरण करून आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते श्रीमंत शिवशरण यांनी आपल्या राजगृह निवासस्थानी आषाढ पोर्णिमा ते अश्विन पोर्णिमा या काळात वर्षावास निमित्ताने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे पठण ठेवले होते.त्या आयोजित वर्षावास धम्म उपक्रमाचे सांगता धम्म कार्यक्रमात वंदनीय भन्ते संघबोधी प्रवचन देत होते. प्रारंभी तथागत भ. गौतम बुद्ध मुर्तीस श्रीमंत शिवशरण त्यांच्या पत्नी संगीता श्रीमंत शिवशरण, त्यांचे चिरंजीव करण ,अविनाश, राहुल यांनी सपत्नीक पुष्प अर्पण करून वंदन केले. तर भारतीय बौद्ध महासभा देहूरोड शहर अध्यक्ष संजय आगळे ,बुद्ध विहार विश्वस्त अशोक रूपवते, जेष्ठ पत्रकार अशोक कांबळे, द जर्नलिस्ट असोसिएशन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रामदास ताटे, पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे मावळ तालुका अध्यक्ष परशुराम दोडमणी यांचे हस्ते दीप प्रज्वलन झाले. बौद्धाचार्य मधुकर रोकडे गुरूजी बौद्धाचार्य प्रा. बबाळासाहेब धावारे सर यांनी वंदनीय भन्ते ना याचना केल्या नंतर वंदनीय भन्ते संघबोधी यांनी बुद्ध ,धम्म ,संघ वंदना दिली. या वेळी शिवशरण परिवारातील लहान बालकांनी न चुकता वंदना म्हणून उपस्थितीतांचे लक्ष वेधले. शुभेच्छा देतांना बौद्धाचार्य प्रा. बाळासाहेब धावारे सरांनी उपस्थितीतांना प्रबोधनात्मक धम्मामृत पाजले. प्रा. बाबासाहेब जाधव सरांनी भारदार भीम गीत, संविधान गीते सादर करून चैतन्य निर्माण केले.तर रामदास ताटे,अशोक रूपवते, अशोक कांबळे, संजय आगळे , धर्मपाल तंत्राने या मान्यवरांनी श्रीमंत शिवशरण यांच्या धम्म उपक्रमाचे आणि घरात निर्माण केलेल्या धम्म संस्काराची स्तुती करून असेच सर्वांनी आपापल्या घरात आपल्या मुलांनवर धम्म उपक्रम राबवून घरात धम्म संस्कार घडवावेत. असे शुभेच्छा देतांना व्यक्त केले. या धम्म कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्रीमंत शिवशरण यांनी वंदनीय भन्ते संघबोधी व भिक्खू संघास चिवर दान, आर्थिक दान प्रदान करून सन्मान केला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला. शेवटी भोजन दाना ने वर्षावास धम्म कार्यक्रमाचे सांगता झाली. 

प्रा बाळासाहेब धावारे संरानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations