धनश्री दिंडे यांचा राजीनामाने अनेक कार्यकत्यांन मध्ये एकच खळबळ अनेक कार्यकर्ते दिंडे यांच्या पाठीशी तर अनेक लोक रामराम करण्याचा तैयारीत.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे शहर प्रवक्ता धनश्री दिंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम म्हणत दिला राजीनामा.

२) धनश्री दिंडे यांचा राजीनामाने अनेक कार्यकत्यांन मध्ये एकच खळबळ अनेक कार्यकर्ते दिंडे यांच्या पाठीशी तर अनेक लोक रामराम करण्याचा तैयारीत.

देहूरोड दि.:-  देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे देहूरोड शहर प्रवक्ता धनश्री दिंडे याचा देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र म्हणत दिला राजीनामा. धनश्री दिंडे हे मागील १६ वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी काम करीत होत्या आज अचानकपणे त्यांनी आपला राजीनामा देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष ॶॅड प्रविण झेंडे सह मावळचे आमदार सुनिल शेळके आणि देहूरोड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला अध्यक्षा अरूणाताई पिंजण यांना सादर केला. 

सदर पत्रा मध्ये वरिष्ठ नेत्यांनकडुन होत असलेल्या अन्याय विरोधात तसेच कुठल्याही ही नियोजना मध्ये सहभागी करून न घेता फक्त आंदोलन मोर्चा व नेत्यांचा घोषणाबाजी साठी वापर करत असल्याचे आरोप करीत त्यांनी राजीनाम्याचे पत्र दिला.अचानक राजीनामा सादर केल्याने देहूरोड शहरांमध्ये कार्यकर्त्यांन मध्ये एकच खळबळ उडाली आहे कारण धनश्री दिंडे यांचा जनसंपर्क दांडगा आहे. यापुर्वीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अजित पवार गटातील पदाधिकारी व अनेक कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकुन शिंदे गटात सामिल झाले.

अचानक राजीनामा दिल्याने अनेक कार्यकर्त्यांनी धनश्री दिंडे यांना भ्रमणध्वनी वर संपर्क साधुन विचारले आपण का? राजीनामा देत आहे तर वरील प्रकार सांगत वरिष्ठ नेत्यांनकडुन कार्यकर्त्यांची दखल घेतली जात नाही विश्वासात घेऊन काम करीत नाही फक्त कार्यकर्त्यांचा वापर केला जात असल्याचे खंत त्यांनी व्यक्त केला मागील अनेक वर्षांपासून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम करीत होते पक्ष फुटी नंतर ते अजित पवार गटात सामील झाले. धनश्री दिंडे यांनी राजीनामा दिल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी पक्षश्रेष्ठी चे जाहीर निषेध व्यक्त करीत आहेत धनश्री दिंडे आम्ही सदैव तुमच्या सोबत आहे काळजी करू नका असे वाॅटसॳप माध्यमातून त्याना पाठिंबा दिला आहे,

 या बाबत द जस्ट आज वृत्त वाहीनीचे प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांनी धनश्री दिंडे यांना संपर्क साधले असता त्यांना विचारले कि आपण पुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरद पवार यांच्या पक्षात काम करीत होते आता आपण राजीनामा दिला आहे तर आपण इतर कुठल्या पक्षात प्रवेश करणार आहे का? परत शरद पवार गटात जाणार आहे असे विचारले असता, अनेक पक्षाचे नेत्याचे व कार्यकर्त्याचे मला फोन येत आहेत सद्या कुठल्या पक्षात प्रवेश करायचे ठरविले नाही सद्या राजकारण पासुन लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे असे द जस्ट आज वृत्त वाहीनी ला माहीत देताना दिली. धनश्री दिंडे यांचा राजीनामा सादर केल्याने अनेक कार्यकर्त्यांनी ही धनश्री दिंडे सोबत असल्याचे दिसत आहे तर अनेक जण पक्षाला रामराम ठोकण्याचा तैयारीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या राजीनामामुळे परत एकदा देहूरोड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पडले आहे आता वरिष्ठ या राजीनामा बाबत काय निर्णय घेतील हे बघावे लागणार आहे. याबाबत शहर अध्यक्ष प्रविण झेंडे व महीला अध्यक्षा यांना संपर्क केले असता संपर्क होऊ शकला नाही.

YOUR REACTION?

Facebook Conversations