त्रैवार्षिक कर च्या निषेधार्थ अनेक राजकीय पक्ष, संघटनेच्या वतीने निवेदने देऊन करवाढीला विरोध, करवाढी कमी न झाल्यास न्यायालयात दाद मागणार, संघटनेच्या वतीने अंदोलनाचा इशारा

देहूरोड दि. ६ :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने सन २०२२ ते सन २०२५ या तीन वर्षासाठी केलेल्या त्रैवार्षिक कर (टेक्स) आकारणी चे प्रसिद्धी पत्रक व जाहीराती द्वारे लोकांना आवाहन केले होते संबंधित इमारतीदार कब्जेदार भाडेकरूने ताब्यात घेतलेले मालमत्ता कर (टेक्स) भरणे आवश्यक आहे असे पत्रक व जाहीराती प्रकाशित केले आणि छावणी कायदा २००६च्या कलम ७५ अन्वये आवश्यकता नुसार बाधित होणाऱ्या सर्व माहिती साठी सार्वजनिक सुचना दिले होते. व प्रसिद्ध केलेल्या दिवसापासून ३० दिवसाच्या आत हरकती मागवल्या होत्या, कॅन्टोन्मेंट बोर्ड ने संपतिदार पुनर्रचने 300 ते 400% टक्के कर (टेक्स) वाढ केली आहे केलेले कर (टेक्स ) वाढ ही अनेक पटीने जास्त आकारले आहे पण हे कर (टेक्स) वाढ सर्व समान नागरीकांना न परवडणारा आहे देहूरोड हे सात वार्डात विभागलेले असल्याने अनेक वार्डात नागरिक मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत अनेक ठिकाणी शौचालय, मुतारी, ड्रेनेज,गटार , रस्ते वीज पाणी असे मुलभूत सुविधा नीट उपलब्ध नाही हा नागरि कर (टेक्स) गरीबांचे कंबरडे मोडणारा कर (टेक्स) आहे ते नियमबाह्य असल्याने अनेक सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांच्या वतीने कर वाढीला विरोध करत निवेदन दिले आहे, तसेच करवाढ कमी न केल्यास न्यायालयात धाव घेतली जाईल व कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासन विरुद्ध अंदोलनाचा इशारा ही दिला आहे. दिनांक ८ तारीख हे आखिरचे दिवस आहे त्यात शनिवारी रविवार हे सुट्टी असल्याने कार्यालय बंद असणार आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयच्या वतीने नागरिकांनी जे हरकती नोंदविले आहे त्याची छाननी करून आलेल्या निवेदनाचे विचार करून पुढील दिशा ठरवणार आहे, अद्याप किती संघटनेने राजकीय पक्ष व नागरिकांनी हरकती नोंदवले आहे हे ही बघणे म्हत्वाचे आहे म्हणून आजच दिवस हे निवेदन देण्याचा शेवटचा दिवस आहे सायंकाळी ५ च्या  नंतरच्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे या अगोदर प्रसिध्दी पत्रकात व जाहीराते द्वारे कॅन्टोन्मेंट बोर्डाने कळविले आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations