देहूरोड कॅंन्टोन्मेंट रेड झोनच्या प्रश्नासाठी मा.संरक्षण मंत्री व राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत लवकरच दिल्लीत बैठक - मा. राज्यमंत्री बाळा भेगडे.
देहूरोड कॅंन्टोन्मेंट भागातील अतिशय महत्वाचा प्रश्न 'रेड झोन' उठविण्या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या समवेत सह्याद्री अतिथी गृह,येथे मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांची शिष्टमंडळा समवेत महत्वाची बैठक संपन्न.


देहूरोड दि. ७:- देहूरोड कॅंन्टोन्मेंट रेड झोन ची टांगती तलवार असल्याने तसेच अनेक लोकांचे जीवनाचे जीवाळ्याचे प्रश्न असल्याने संरक्षण खाते ने देहूरोड वर लादलेले अन्याय कारक रीती २००० यार्ड रेड झोन पारित करून देहूरोड रहिवाशांनवर अन्याय करीत आहेत या भस्मासुराचा नायनाट करण्यासाठी अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षाचे लोकांनी विविध प्रकारच्या मोर्चे काढून रेड झोन बाबत आवाज उठविले होते या बाबत वरील वरिष्ठांना लवकरच पत्र व्यवहार करू असे सांगून मलमपट्टी करण्याचा अधिकारी प्रयत्न करत आहेत आता मा.राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी या बाबत ठोस पाऊल उचलले आहे यावेळी देहूरोडच्या जनतेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने लावण्यात आलेल्या रेड झोन संदर्भातला मुद्दा बैठकीत मांडून देहूरोड कॅंन्टोन्मेंटच्या हद्दीतून 'रेड झोन' हदपार करण्याची मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे. या मुळे परत एकदा देहुरोडकंराना आशाचे किरण दिसु लागले आहे. 

कारण देहूरोड शहराचे शहरीकरण खुपच वाढले आहे घरांचे जमीनीचे किमती खुपच वाढले अनेक लोकांनी जमीनी घेऊन घरे बांधण्याची स्वप्नने बघितले तर अनेक बिल्डर्स लोकांनी उंच उंच गगनचुंबी इमारती बांधून कोट्यवधी रुपये खर्च केले संरक्षण खाते ने रेड झोन ची परत मर्यादा वाढविल्याने घर जमीन सदनिकेचे किमती ढासळली आहे याचा फटका सर्व सामान्यांना जास्त बसले आहे या बाबत मा. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी बैठकीत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली असता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मा.संरक्षण मंत्री यांच्याकडे तात्काळ बैठक लावण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या महत्वपूर्ण बैठकीत ज्यातील कटक मंडळांना ५ कोटी रुपयांचा विकासनिधी मिळावा याकरीता ही मागणी करण्यात आल्याची सांगण्यात आले

या बैठकीत जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, कॅन्टोन्मेट बोर्ड चे मनोनित सदस्य ॶॅड.कैलास पानसरे, बाळासाहेब शेलार, मदन सोनिगरा, बाळासाहेब झेंडे, रघुवीर शेलार, राहुल बालघरे, हनीफभाई शेख, तुकाराम जाधव, उमाशंकर सिंह,विलास शिंदे, धीरज नायडू, दिनेश सिंग, रामचंद्र थोरात, अमोल नाईकनवरे आदी उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations