पोलीसांनी आरोपीला केले अटक.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

 देहूरोड दि. :- पती पत्नीचे एक अटुट नाते असते पण या नात्याला न जपता कधी कधी संशय घेतल्याने पती पत्नी मध्ये भांडण कलेश उत्पन्न होतात असेच चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीवर ऊस तोडीच्या कोयत्याने जीवघेणे वार केले आहे यावरून देहूरोड पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी दि.२४ रोजी देहूरोड येथे घडली.

याप्रकरणी ४६ वर्षे महिलेने देऊळ पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे. फिर्यादीवरून देहूरोड पोलिसांनी गिलानी समाझी कुरेशी (वय ४६ रा.देहूरोड) याला अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच पाठीमागून ऊस तोडीच्या कोयत्याने डोक्यावर व हाताच्या कोपऱ्यावर कोयत्याने वार करत जीव मारण्याचा प्रयत्न केला. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations