सर्व सामाजिक संघटना व राजकीयक्षेत्राच्या वतीने जाहीर निषेध, सडख्या मेंदुचे राज्यपालांनी ताबडतोब राजीनामा द्यावा. शिंदे सरकारने राज्यपालाची हकालपट्टी करावी.

वृत संपादक अशोक कांबळे सह चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि. २४ :- महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सडख्या मेंदुचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व भाजपा प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांच्या बेताल वक्तव्यच्या निषेधार्थ देहुरोड ऐतिहासिक सुभाषचंद्र बोस चौकात जाहीर निषेध करण्यात आला. 

महाराष्टाचे आराध्यदैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वर बेताल व्यक्तव्य करून गरळ ओकणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांनी गरळ ओकल्याने संपुर्ण राज्यात संतापाची लाट उसळली या पुर्वी ही असेच छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले सावित्रीबाई यांच्या वर बेताल वक्तव्य राज्याचे राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार केले होते. त्यामुळे आता परत बेताल बोलणारे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी व सुधांशु त्रिवेदी यांचा जाहीर निषेध करत महाविकास आघाडी व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करत सडख्या मेंदुचे राज्यपालांना ताबडतोब पदावरून हटवण्याची मागणी या वेळी करण्यात आले. 

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रविण झेंडे यांनी कोश्यारी व सुधांशु यांचा चांगलाच समाचार घेतला छत्रपती शिवाजी यांचे ईतिहास चरित्र माहीत नसलेले व सडख्या मेंदुचे राज्यपालांनी असे वक्तव्य आम्ही कदापि सहन करणार नाही, असे बेताल बोलणारे राज्यपाल यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा महाराष्ट्रात असे राज्यपालाची गरज नाही असे संतप्त मनोगत व्यक्त केले, या वेळी कामगार सेलचे अध्यक्ष दिपक चौगुले यांनी ही भगतसिंग कोश्यारी यांचा चांगले समाचार घेत या पुर्वी ही शाहू फुले बाबत गरळ ओकले होते असे महान लोकांचे अपमान करणारे डोक्यात मेंदू नसलेले लोकांना आमही आजिबात सहन करणार नाही बोलत समाचार घेतला, या वेळी चंदा पवार यांनी ही तिखट शब्दात निषेध केला महाराष्ट्र हे आमचे शाहू फुले आंबेडकर विचाराचे महाराष्ट्र आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे महाराजाचे अपमान करणारे लोकांना कदापि माफ करणार नाही असे तिखट शब्दात निषेध केला व हिरामण साळुंके शिवसेना जेष्ठ नेते यांनी ही कडकडून निषेध व्यक्त करत महाराष्ट्र हे आमचे पुण्यभूमी आहे या पुण्यभुमीवर आमचे दैवत छत्रपती शिवाजी यांचे अपमान करणारे मेंदू नसलेल्या राज्यपालांना पदावरून ताबडतोब काढून टाका असे निषेध व्यक्त केला . या वेळी धनराज शिंदे यांनी राज्यापालावर निषेध व्यक्त करत महाराष्ट्र हे आमचे शाहू फुले सावित्रीबाई आंबेडकर यांच्या महाराष्ट्र आहे असे उच्च पदावर बसुन महापुरूषांचे अपमान करणारे सडख्या मेंदुचे राज्यपालांना व सुधांशु त्रिवेदी यांना त्यांची जागा काय आहे हे महाराष्ट्र दाखवले शिवाय राहणार नाही असे संताप व्यक्त केले 

या वेळी मनसेचे सौ. कळसकर मैडम, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मावळ तालुका सरचिटणीस हिरामण साळुंके, कामगार सेलचे अध्यक्ष दिपक चौगुले, शिवसेना चे जेष्ठ नेते रमेश जाधव युवा नेते धनराज शिंदे विलास हिनकुले, चंद्रकांत दाभोळे, शिवाजी दाभोळे, राजेंद्र शैलार, बाळासाहेब जाधव,राजेंद्र मराठे, मेहरबान सिंग, रफिक शेख, गोविंद राऊत, संजय शेंडे, सुरेश मुळे, धनंजय मोरे, सुभाष चंडालिया, विजय पवार किसन तरस संदिप जावळे व महिला कार्यकर्ता उपस्थित होते.

•••••••••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞. 

{9767508972}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations