दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व भारतीय बौद्ध महासभा,देहूरोड शहर शाखा व महिला वार्ड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा व आश्विन पौर्णिमा निमित्त वर्षावास कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

देहूरोड दि १७ :- गुरू पौर्णिमा, वैशाख पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमा हे बौद्ध बांधवांन साठी खुपच महत्त्वाचे असल्याने बौद्ध अनुयायी साठी हे एक जणु पर्वच असतो विविध कार्यक्रम व प्रत्येक घरामध्ये बौद्ध बांधव वर्षावास कार्यक्रम करून वर्षावासाचा महत्त्व सांगितले जाते अनेक बौद्धाचार्य व भंते या विषयावर प्रवचन करून धम्म रस उपासक व उपासिका यांना पाजत धम्म देसना देतात. वैशाख पौर्णिमा चे महत्त्व असे आहे कि याच दिवशी तथागत गौतम बुद्ध यांचा जन्म लुंबिनी येथे झाला होता आणि याच दिवशी उरूवेला येथे बौद्ध वृक्षाखाली भगवान गौतम बुद्धांना बुद्धत्व प्राप्त झाला होता आणि याच दिवशी कुशीनगर येथे जोडेशाल वृक्षाखाली भगवान गौतम बुध्दांचा महापरिनिर्वाण झाला म्हणून हे दिवस तीन प्रकारे अत्यंत महत्त्वाचे व पवित्र मानले जाते आषाढ पौर्णिमाचे महत्त्व या साठी कि याच दिनी बौध्दीसत्व गौतम बुद्धांनी महामाया देवी यांच्या गर्भात प्रवेश केला होता आणि याच दिवशी ऋषी पतन मृगदाय (सारनाथ) येथे पहिले धम्म चक्र परिवर्तन भगवंताने केला होता भारता सह अनेक देशातील बुध्द बांधव वर्षावासाचा कार्यक्रम आयोजित करून भगवान बुद्ध चे स्मरण करत पुजा पाठ पठण करत असतात असेच प्रत्येक सालाबाद प्रमाणे भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पश्चिम विभाग अंतर्गत, देहुरोड शहर शाखा व महिला वार्ड शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा वर्षावास प्रवचन मालीका २०२२ उद्घाटन सोहळा रविवार दिनांक १७ जुलै २०२२ रोजी ऐतिहासिक बुद्ध विहार देहुरोड येथे मंगलमय वातावरणात संपन्न करण्यात आला. 

 या प्रसंगी पुज्यनिय भंते बुद्धरत्न व भंते अंगुलीमाल यांनी उपस्थितांना त्रीसरणं पंचशील सह सर्वांप्रती मंगलकामना व्यक्त करुन पुढील कार्याच्या शुभेच्छा दिल्या. 

वर्षावास प्रवचन मालीकेचे उध्दघाटन पुणे जिल्हाचे पश्चिम सरचिटणीस राधाकांत कांबळे यांच्या हस्ते उध्दघाटन करण्यात आला 

सदर कार्यक्रमाच्या निमीत्ताने गुरू पौर्णिमा आषाढ पौर्णिमा व वर्षावासाचे महत्व या विषयावर केंद्रिय शिक्षक राजेंद्र भोसले गुरूजींनी अत्यंत सरळ भाषेत प्रवचन दिले.सर्व उपस्थित उपासक उपासिका हे स्तब्ध होऊन ऐकत होते. 

कार्यक्रमास भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पुर्व- पश्चिम पदाधिकारी,समता सैनिक दल पदाधिकारी,सानिक केंद्रिय शिक्षक,बौद्धाचार्य यावेळी उपस्थित होते,

असिस्टंट लेफ्टनेंट जनरल पी.एस.ढोबळे यांनी वर्षावास प्रवचन मालीकेच्या उपक्रमास केंद्र व राज्य कार्यकारिणी यांच्यावतीने सर्व बौद्ध बांधवाना वर्षावासाचा शुभेच्छा दिल्या,भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा संस्कार सचिव दलितानंद थोरात यांनी पुणे जिल्हा कार्यकारिणी व सर्व तालुका कार्यकारीणी यांच्यावतीने वर्षावासाचा शुभेच्छा दिल्या,पुणे जिल्हा पश्चिम कोषाध्यक्ष भीमराव ढोबळे,कार्यालयीन सचिव व देहुरोड पालकमंत्री भास्कर जावळे,पुणे जिल्हा संघटक गौतम ओव्हाळ सह समता सैनिक दल ऑफिसर्स मेजर सुरेश भालेराव,मेजर किरण आल्हाट,मेजर एम. डी. लोंढे,खेड तालुका सरचिटणीस व सिनीयर डिव्हीजन ऑफिसर सुजितकुमार जाधव,डिव्हीजन ऑफिसर राजेंद्र बडेकर,डिव्हीजन ऑफिसर अशोक चाबुकस्वार, कंपनी कमांडर बाळासाहेब रणदिवे डिव्हीजन ऑफिसर प्रज्ञा आगळे (केंद्रीय शिक्षिका)   सह पुरूष व महिला सैनिक कार्यक्रमास ऊपस्थित होते. 

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभा देहुरोड शहराध्यक्ष संजय आगळे यांनी भुषवले तर सर्वानुमते अनुमोदन मधुकर रोकडे यांनी दिले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सु.भा.पवळ यांनी केले. 

कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षा आशाताई गायकवाड यांनी सर्वांचे शब्दसुमनाने स्वागत केले. या मंगलमय प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आदर्शांचे दिप,धुप,पुष्पांनी पुजन करण्यात आले व सामुदायिकरीत्या सत्तपठन घेण्यात आले, उपासिका आशा माने यांनी सुमधुर आवाजात स्वागतपर गीत गायन करुन सर्वाना मंत्रमुग्ध केले व सर्वांचे मने जिंकली

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन देहुरोड शहर शाखा सरचिटणीस प्रकाश कांबळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्रमदान,धम्मदान,सम्यदान देणा-या देहुरोड शहर शाखा पदाधिकारी व महिला वार्ड शाखा कार्यकारिणी व कार्यक्रमास ऊपस्थित पदाधिकारी व सैनिक यांचे आभार भारतीय बौद्ध महासभेचे देहूरोड शहर अध्यक्ष संजय आगळे यांनी मानले. या वेळी मानवतावादीचे दर्शन घडवत समता सैनिक दलाच्या युनिट लिडर कालवश राधाबाई साळवे यांना सर्वांनी श्रद्धांजलि वाहीली व सरणत्तय घेऊन कार्यक्रमाचा सांगता करण्यात आला.

YOUR REACTION?

Facebook Conversations