वारंवार रेडझोन सीमा घोषित केले जात आहे,कायदा पायदळी तुडवून रेडझोन जाहीर करत आहेत ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही :- रेडझोन समिती अध्यक्ष सुदाम तरस.

देहूरोड दि. २०:-(वृतप्रतिनिधी -चंद्रशेखर पात्रे)

            फुले,शाहु,आंबेडकर विचार मंचच्या वतीने रेडझोन हटाव देहूरोड बचाओ चा नारा देत जन आक्रोश व धडक मोर्चा काढण्यात आला.

 सकाळी ११ वाजता हा मोर्चा विकासनगर येथुन रेडझोन हटाव देहूरोड बचाओ, रेडझोन हटाव,अपना घर बचाओ, च्या घोषणाबाजी करत बॅक ऑफ इंडिया तसेच सवाना उपहार गृह येथे येऊन उडानपुला खाली जोरदार घोषणाबाजी करत जुने मुंबई पुणे रोड वरून देहूरोड आयुध निर्माण डेपो येथे धडकला.

 विकासनगर येथुन महिला पुरुषा सहित रेडझोन हटाव देहूरोड बचाओ, फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे व सिंधुताई धर्मपाल तंतरपाळे व मा.नगरसेवक बाळासाहेब तरस यांच्या नेतृत्वाखाली आज आयुध निर्माणी देहुरोड वर धडक मोर्चा व जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.

आयुध निर्माणी देहुरोड पासुन २००० यार्ड रेडझोन विकासनगर किवळे परिसर ,रावेत,मामुर्डी,पर्यन्त लागु असलेले २००० यार्ड रेडझोन जाहीर केले ते शिफारस रद्द करुन फक्त २७० यार्ड रेडझोन हद्दच जाहीर करावा व गरज नसतांना ही २००० यार्ड आयुध निर्माण डेपो ने लावलेला रेडझोन रद्द करावा,या मागणीचे निवेदन फुले शाहू आंबेडकर विचार मंच व रेडझोन संघर्ष समितीच्या वतीने आयुध निर्माणी डेपो देहुरोड चे महाप्रबंधक श्री संजिव गुप्ता यांना देण्यात आले. हे जन आक्रोश धडक मोर्चा मुंबई पुणे रोड वर आयुध निर्माण गेट समोर येऊन धडकले तेव्हा फक्त शिष्ठमंडळाचे फक्त सात लोकांना आत मध्ये प्रवेश देण्यात आला.या वेळी पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आला.

         रेडझोन संघर्ष समितीचे अध्यक्ष सुदामराव तरस यांनी आयुध निर्माण डेपो चे जनरल मॅनेजर संजीव गुप्ता ,कार्यालय प्रबंधक गौरव माळवी,कर्नल श्री जाधव कर्नल जयवर्धन यांना आपण २००० यार्ड रेडझोन क्षेत्र घोषित करू शकत नाही आपण जास्तीस जास्त २७० यार्ड रेडझोन लावु शकता असे सांगितले असता या पुर्वीचे घोषित केलेल्या तसे कागदप्रत्र आम्ही तुम्हाला देतो, असे शिष्ठमंडळाच्या वतीने सांगण्यात आले यावर संजीव गुप्ता यांनी आम्ही कागदपत्र बघुन आम्ही निर्णय घेतो व तुमची मागणीचे निवेदन वरिष्ठ कार्यालयाला पाठवितो असे ठोस आश्वासन दिले तेव्हा आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले, निवेदन दिल्या नंतर आयुध निर्माण डेपो च्या शेजारी उभे राहून माध्यामांना वरील सर्व आतील प्रकार सांगितले. या पुढे संघर्ष समितीचे काय भूमिका असेल असे विचारले असता सुदाम तरस यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केले सद्या आम्ही संरक्षण खात्याला निर्वाणीचे इशारा दिला आहे संरक्षण खात्याला नवीन रेडझोन लावण्याची काहीच गरज नाही २०१३ला रेडझोन घोषित केले होते आता २०१३ला पुर्वीचा कायदा पायदळी तुडवून २०२३ला चुकीचे रेडझोन जाहीर करण्यात आले आहे, आयुध निर्माण डेपो येथे जेथे शस्त्र निर्मिती केली जाते ते विस्फोटक नाही या खात्याचे डीआरडीओ शास्त्रज्ञ ने म्हटले आहे ज्या ठिकाणी पासून विस्फोटक तैयार होतात ते त्या स्थानक पासून फक्त २७० मीटर इतके पर्यंत पुरेशी आहे. १९०३च्या रेडझोन कायदा पायदळी तुडवून नवीन रेडझोन करणे हे बेकायदेशीर आहे १९९२ मध्ये दिघी भोसरी या भागा मध्ये ११४५ मीटर अनायकारक रेडझोन लावले नंतर ४०० मीटर जाहीर केले परत २००५ ला ५७० मीटर करण्याचे ठरवले या बाबत ऑर्डनन्स फॅक्टरी चे मॅनेजर, पिंपरी चिंचवड आयुक्त,पुणे जिल्हा कलेक्टर प्रतिनिधी यांचे त्रिसदस्यीय पक्षीय करार करण्यात आला होता व रेडझोन ची सीमा ५१० करण्यात आला तो कोर्टात सादर झाला पुन्हा संरक्षण ने २०११ ला परत ११४५ जाहीर केले प्रत्येक वेळी यांची दादागिरी चालले आहे ही दादागिरी आम्ही खपवून घेणार नाही पुढे वेळ आली तर आम्ही लाखोंच्या संख्येने रेडझोन च्या विरोधात लढु असे या सुदाम तरस यांनी सांगितले. देहुरोड कॅन्टोमेन्टचे प्रसाकिय अधिकारी ॶॅड कैलास पानसरे यांनी रेडझोन च्या संदर्भात रेडझोन समितीचे अध्यक्ष सुदाम तरस सर्व सहकारी मित्रांनी बैठक आयोजित केली होती मी प्रशासनाचे धन्यवाद मानतो त्यांनी आमचे शिष्ठमंडळाचे म्हणने गांभीर्याने एकुन घेतले व आमची बाजु नीट समजून घेतले त्यामुळे मिटिंग सकारात्मक झाले आहे पण भविष्यात जर रेडझोन बाबत कसले ही प्रकारची तडजोड आम्ही सहन करणार नाही प्रशासनाने आमचे म्हणने मान्य केले नाही तर केंद्र शासन असो राज्य शासन असो पुढच्या येत्या काळात संघटनेच्या वतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल अशी प्रतिक्रिया पानसरे यांनी व्यक्त केले.या वेळी शेवटी फुले शाहू आंबेडकर विचार मंचचे अध्यक्ष व रेडझोन कृती समितीचे धर्मपाल तंतरपाळे यांनी आजच्या मोर्चाचे निवेदन दिल्यानंतर शिष्टमंडळाचे म्हणने एकुन घेऊन रेडझोन च्या संदर्भाचे सर्व कागदपत्रे आमच्या कडे सादर करा व ते आम्ही वरच्या पातळीवर पाठवुन देऊ असे सांगितले आहे थोड्याच दिवसात रेडझोन वर निर्णय घेतला जाईल या पुढे आम्ही २०२३ चा रेडझोन सहन करणार नाही प्रत्येक वेळी नवीन रेडझोन सीमा जाहीर करत आहेत आम्ही जगायचे कि मरायचे असे असे संतप्त सवाल उपस्थित करत रेडझोन मुळे आमचे हाल झाले आहे जर रेडझोन बाबत संरक्षण खात्याने योग्य ते निर्णय घ्यावा या नंतर चे आंदोलन न भुतो न भविष्य असे होईल आम्ही रस्ता रोको, रेल रोको किंबहुना आत्मदहन ही करू अशा गंभीर इशारा दिला आहे. या जन आक्रोश धडक मोर्चा मध्ये नगरसेवक बाळासाहेब तरस,रेडझोन समीतीचे निलेश तरस, राजेन्द्र तरस, या वेळी ह्युमन राईट्स जस्टीस असोसिएशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देत धर्मपाल तंतरपाळे यांना पत्र देण्यात आले. राष्ट्रीय उपाध्यक्ष तनवीर मुजावर जिल्हा सरचिटणीस चंद्रशेखर पात्रे, ह्युमन राईट्स फोर प्राॅटेक्शन चे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी कुंडलिक आमले,बापुसाहेब कातळे,तुषार तरस, देहुरोड कॅन्टोमेन्टचे प्रशासक कैलास पानसरे मा,नगरसेवक गोपाल तंतरपाळे,उपस्थित होते,या आंदोलनात शाम सिंधवाणी,सुधीर तरस,बापुसाहेब गायकवाड,दिलीप कडलक,अन्वर तांबोळी,बाळासाहेब जाधव,अरुण जगताप,अशोक सोनवणे,सुधीर किस्ते,शुभागीताई वानखडे,सुनिता चांदणे,मंदाकीनी भोसले,नंदा गायकवाड,सारीका सोनवणे,वैशालीताई अवघडे,मीना वाघमारे ,

सुनिता मनोहरे,अंकुश कुडले,अंकुश तरस,सुधाकर माळी,सुमित सिंधवाणी,रोहीत सरनोबोत ,दिपक सायसर,राकेश सोलंकी,रमेश पवार ,सोलोमन भंडारी,राजेश शंमभरकर,किरण कांबळे,मेघराज तंतरपाळे,सुनिल ननवरे,राजेन्द्र पवार,सुध्दोधन वानखडे,चंन्द्रकांत वाघमारे,गणेश कोडप्पा,प्रजव्ल वानखडे, दौलत कुरेशी,अजय बखारिया,शिवराम अहिरे,असे बहुसंख्येने नागरिक कार्यकर्त उपस्थित होते, या आंदोलनाचे आयोजन पंकज तंतरपाळे यांनी केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations