रस्त्यावर मारहाण करताना कोणीही अडविण्याचा प्रयत्न केला नाही, जबर मारहाण झाल्याने पत्नीचा मृत्यू. महिला ने दाखल केले फिर्याद.


देहुरोड :- पतीने पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला बेदम मारहाण केली. पतीने रस्त्यावर जबर मारहाण केल्याने मारहाणीत पत्नीचा चक्क मृत्यू झाला आहे. ही घटना देहुगाव येथे घडली.


या बाबत आरोपी पती सोहन प्रभाकर साठे (वय ४५ रा.देहुगाव) याला देहुरोड पोलिसांनी अटक केली असून पोलीस ठाण्यात २९ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण रंजिता सोहन साठे (वय ३९) असे मयत महिलेचे नाव आहे.

 आरोपीने केवळ चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला घरासमोरील रस्त्यावर बेदम मारहाण केली. या मारहाणीमध्ये पत्नीचा चक्क मृत्यू झाला. यावेळी भर रस्त्यात मारहाण होत असताना कोणीही आरोपीला अडविण्याचा प्रयत्न केला नाही व कोणीही मध्यस्थी केली नाही, या जबर मारहाणीतच पत्नीचा मृत्यू झाला. देहुरोड पोलिसांनी पती सोहन प्रभाकर साठेला बेड्या ठोकल्या असून  पुढिल तपास देहुरोड पोलीस करत आहेत.


••••••••••••••••••••

बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. 


{9767508962}

{7219500492}

{9850826340}

•••••••••••••••••••••

YOUR REACTION?

Facebook Conversations