*डाॅ.प्रा.सखाराम वाघमारे यांना छ.शाहु महाराज राष्ट्रीय न्यायप्रिय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान २) राष्ट्रीय मुलनिवासी


बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने आयोजित प्राध्यापक शिक्षक,मुलनिवासी बहुजन कर्मचारी शिक्षकेतर कर्मचारी दुसर्‍या विभागीय अधिवेशनात डाॅ. प्रा.सखाराम वाघमारे यांनी केलेल्या अभ्यासपूर्ण लेखन उल्लेखनीय कार्याचा गौरव

लातूर :

          राष्ट्रीय मुलनिवासी (RMBKS) संघ यांच्या वतीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी (PROTAN) चे आज लातूर येथील बसवेश्वर महाविद्यालयाच्या सभागृहात शिक्षण क्षेत्रावर दुसरे विभागीय अधिवेशन संपन्न झाले.

    या अधिवेशनात शैक्षणिक, सामाजिक व वैचारिक लेखन उलेखनीय कामगिरीची प्रोटान ने दखल घेऊन वसुंधरा महाविद्यालय घाटनांदुर येथील भूगोल शास्त्र विभाग प्रमुख व संशोधन मार्गदर्शक प्रा.डाॅ. सखाराम वाघमारे यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय न्यायप्रिय आदर्श शिक्षक पुरस्कार स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. रवि सरवदे, प्रोटान चे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. संजय धाबाडे, स्वामुटा नांदेड चे सचिव उत्तम गायकवाड, विभागीय अध्यक्ष पुरुषोत्तम मोरे, लातूर जिल्हा अध्यक्ष सतिश नणिर बसवेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य आदी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सन्मानार्थी डाॅ. प्रा.सखाराम वाघमारे यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations