छ. शिवराय मुस्लिम विरोधी होते हे थोतांड इतिहास.

पुणे :

                             छत्रपती शिवाजी महाराजांची गो ब्राम्हण प्रति पालक आणि मुस्लिमांचे वैरी अशी चूकीची प्रतिमा रेखाटली आहे. मनु ब्राह्मण्यवादी विचारांच्या सदाशिवपेठी लेखकांनी जानुन बुजुन असे लिखाण केले आहे. मुळात छत्रपती शिवाजी महाराज हे कुळवाडी भूषण , बहुजन प्रतिपालक होते. समतावादी विचारांचे होते. मनुवादी लेखकांनी केलेली दिशाभूल आता शिवप्रेमींच्या लक्षात आली आहे. आता सत्य ईतिहास समोर आला आहे. या पुढे ब्राह्मण्यवादी थोतांड ईतिहास खपवून घेणार नाही. असा ईशारा संभाजी ब्रिगेडचे परिवर्तनवादी विचारांचे पंडितराव देशमुख यांनी शिवप्रताप दिनानिमित्त व्यक्त केले.  

                        पंडितराव देशमुख अधिक मत मांडताना म्हणाले की, ईयत्ता दहावी होई पर्यंत आम्हाला कृष्णा भास्कर कुलकर्णी याचे छत्रपती शिवरायांनी मुंडके उडवून ठार मारले. हा इतिहास आम्हला गुरुजींनी शिकवलाच नव्हता. त्यांचा काय दोष ? पुण्याच्या सदाशिव पेठेतून बनणाऱ्या शालेय अभ्यासक्रमामध्ये कुलकर्णी नव्हताच. पण , आता इतिहास समजल्यावर जी आम्ही पूर्वी घोषणा द्यायचो ती चुकीची होती. याची जाणीव झाली ."गो ब्राम्हण प्रतिपालक ! अशी शिवरायांची प्रतिमा बनवल्या मुळे शिवराय जणू मुसलमानांचे कर्दनकाळ होते असे असत्य चित्र रेखाटले गेले व तोच खोटा ईतिहास आमच्या मनावर कोरले गेले.

खरा इतिहास पाहता शिवराय कोण्या धर्मा विरुद्ध नव्हते हे सिद्ध होते . ज्यांनी गद्दारी केली त्यात मुसलमान सोबत , ब्राह्मण , मराठा यांना ही शिवरायांनी मृत्यूदंड दिला आहे . 

स्वराज्याच्या आड येणारा प्रत्येक जण शत्रू .... हा छत्रपती शिवरायांचा नियम होता असे ही मत पंडितराव देशमुख यांनी मांडले. या पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि क्षात्रवीर छत्रपती संभाजी महाराजांचा सत्य इतिहास जगा समोर आणण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचे विचार पंडितराव देशमुख यांनी व्यक्त केले.

YOUR REACTION?

Facebook Conversations