उत्तर प्रदेशात दलितांनी दिली भाजप ला साथ ३० टक्के मतदान दलितांचे, दलितांचे साथ मिळाल्याने भाजपाचा विजयी

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे


मुंबई दि. 10 - देशाचे लक्ष लागलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा आज निकाल लागला असुन त्यात पंजाब वगळता उत्तर प्रदेश ;उत्तराखंड; मणिपूर आणि गोवा या चार राज्यांत भाजप ने विजयाचा गड सर केला आहे.गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशभर जे चांगले काम झाले त्याच्या फळस्वरूपात भाजप ला विजय मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचा करिश्मा म्हणून चार राज्यांत भाजप एनडीए चा विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिली आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 80 कोटी गरिबांना मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय; मोफत वाक्सिन देण्याचा निर्णय तसेच पंतप्रधान आवास योजना; उज्वला योजना; जनधन योजना; जन आरोग्य योजना आदी अनेक योजना राबविल्या. गरीब सामान्य जनता; सर्वांना साथ; सर्वांचा विकास त्यातून सर्वांचा विश्वास जिंकण्याचा करिष्मा पंतप्रधान मोदींनी केला आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुंडाराज संपविला.माफियाराज संपविला. त्यामुळे उत्तर प्रदेशात भाजप ला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. असे ना रामदास आठवले म्हणाले.

उत्तर प्रदेशात 10 ते 12 दिवस मी प्रचारात होतो. तेथे अनेक सभांमधून मी दलित बहुजनांना आवाहन केले होते की तुम्ही बहिणीला म्हणजे अनेकवेळा बहण मायावती ला संधी दिली.आता मात्र आरपीआयच्या भावाला संधी द्या. आरपीआय च्या माध्यमातून भाजप ला साथ द्या असे आवाहन केले होते. त्याप्रमाणे यंदाच्या निवडणुकीत दलित जनतेचे 30 टक्के मतदान भाजप ला मिळाले आहे. दलित मतांची चांगली साथ मिळाल्याने भाजप ला उत्तर प्रदेशात विजय मिळाला आहे असे ना.रामदास आठवले यांनी सांगितले.


मणीपूर मध्ये आरपीआय चे महेश्वर थनंजम यांचा 183 मतांनी विजय हुकला. अन्यथा मणिपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाने खाते उघडले असते असे ना.रामदास आठवले म्हणाले. 

YOUR REACTION?

Facebook Conversations