चांदखेड पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या न्युज इंग्लिश स्कूल या शाळेच्या इयत्ता ९ वी तील विद्यार्थ्यांचा आपल्या शालेय बांधवांसाठी स्तुत्य उपक्रम

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे

चांदखेड दि. १२ :- 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळ,पुणे' या संस्थेच्या 'न्यू इंग्लिश स्कूल, चांदखेड' या विद्यालयामध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नुकताच सदिच्छा समारंभ आयोजित करण्यात आला होता. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या या शालेय बांधवांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक अनिलकुमार भोसले उपस्थित होते. "जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजन यांचा नेहमी आदर करावा. तसेच समाजा प्रती नेहमी कृतज्ञतेचा भाव विद्यार्थ्यांनी मनी ठेवावा. नेहमी सकारात्मक दृष्टीकोन बाळगावा.," अशा प्रकारचे बहुमोल,मोलीक मार्गदर्शन अनिलकुमार भोसले यांनी विद्यार्थ्यांना केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयातील प्रभारी मुख्याध्यापक सत्यवान पवार होते. याप्रसंगी विद्यालयातील जेष्ठ अध्यापिका शुभांगी पवार, वीरेंद्रप्रसाद जाधव, सरला भोये, तृप्ती विरणक,पांडुरंग खांडवी,तरुणा सुपे, माधवी फापाळे, सिताराम मधवे, सुकेशनी लोंढे, युवराज शेलार तसेच विलास गायकवाड, संजय मदने व इतर शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना एस .एस. सी .बोर्ड परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी देखील विद्यालयात शिकत असताना आपल्या गुरुजनांचे आलेले अनुभव कथन केले. भावनेने ओत प्रोत भरलेल्या या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीतील विद्यार्थिनी कु. समृद्धी बावकर हिने केले. . या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन इयत्ता नववीचे विद्यार्थी व वर्ग शिक्षक यांनी केले. 

 वृत्त संपादक अशोक कांबळे बातमी व जाहीराती साठी संपर्क🗣📲📞 9767508972/7219500492

YOUR REACTION?

Facebook Conversations