या घटने मध्ये सात पैकी तीन लहान मुलाचे समावेश, घातपात कि आत्महत्या पोलीस तपास करीत आहेत.

यवत/दौंड दि. २५ :- दौंड तालुक्यातील पारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये भीमा नदीपात्रात मागील पाच दिवसामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह आढळून आले होते. ही घटना ताजी असतानाच याच कुटुंबातील बेपत्ता असलेल्या तीन लहान मुलांचे मृतदेह मंगळवारी (दि.२४) दुपारी एकच्या सुमारास आढळून आले आहेत. आतापर्यंत आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या सहा दिवसात सात मृतदेह आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मोहन उत्तम पवार (अंदाजे वय ५०), संगीता मोहन पवार (अंदाजे वय- ४५ दोघे रा. खामगांव ता. गेवराई), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय-३२) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-२७) त्यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय-७), छोटू फुलवरे (वय-५), कृष्णा (वय-३) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. माती वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.आतापर्यंत आढळून आलेल्या मृतदेहांमध्ये दोन पुरुष दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. गेल्या सहा दिवसात सात मृतदेह आढळून आल्याने परिसरात भितीचे वातावरण आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आल्याने दौंड तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मोहन उत्तम पवार (अंदाजे वय ५०), संगीता मोहन पवार (अंदाजे वय- ४५ दोघे रा. खामगांव ता. गेवराई), त्यांचा जावई शामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय-३२) त्याची पत्नी राणी शामराव फुलवरे (वय-२७) त्यांचा मुलगा रितेश शामराव फुलवरे (वय-७), छोटू फुलवरे (वय-५), कृष्णा (वय-३) अशी मृत्यू झालेल्या सात जणांची नावे आहेत. माहीत प्रमाणे हे वडार समाजातील भटकंती करणारे हे कुटुंब असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बुधवारी दिनांक १८ भीमा नदी पाचरात स्थानिक मच्छीमार मासेमारी करत असताना त्यांना एक महिलेचा आढळून आला त्यानंतर शुक्रवारी दिनांक २० रोजी पुरुषाच्या मृतदेह आढळला शनिवार दिनांक २१ रोजी पुन्हा एक महिलेचा तर रविवारी दिनांक २२ रोजी एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला पाच दिवसाच्या चार मृत्युदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली त्यातच मंगळवारी दिनांक २४ रोजी पुन्हा तीन मुलांचे मृतदेह नदी पात्रात आढळून आले आहेत

या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलिसांची पथके तपासासाठी रवाना केली. दरम्यान रविवारी सापडलेल्या मृतदेहाजवळ एक चावी तर दुसऱ्या मृतदेहाजवळ मोबाईल आणि सोने खरेदीची पावती सापडल्याचे यवत पोलिसांकडून सांगण्यात आले. यावरुन पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

दरम्यान, नदी पात्रात सापडलेले मृतदेह ही आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत.

भीमा नदीपात्रात सलग मृतदेह सापडण्याची ही पहिलीच वेळ असून वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

हा घातपात आहे की आत्महत्या हे शवविच्छेदनानंतर उघड होणार आहे.

पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे करीत आहेत.

YOUR REACTION?

Facebook Conversations