देहुरोड कंन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित कुमार माने यांच्या हस्ते राजमुद्रा प्रदानकर्ते बाबु हिरमठकर सह पदाधिकार्याचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान, बोर्ड कार्यालयात भारतीय राजमुद्रे व फलक अनावरण समारंभ संपन्न.

                    

 देहूरोड दि. २७ :- देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड मानवाधिकार सामाजिक संघ व मानवाधिकार संरक्षण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने बोर्डाच्या ध्वज  स्तंभा शेजारील उभारण्यात आलेल्या भारतीय राजमुद्रेतील चार सिंह आम्हाला दररोज प्रेरणा देत राहतील असे मत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमित कुमार माने यांनी केले.                         

 प्रारंभी देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाचे नामनिर्देशित सदस्य ॶॅड कैलास पानसरे बोर्डाचे अध्यक्ष राजन सावंत राजमुद्रा अनावरण मुख्य संयोजक मानव अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एमडी चौधरी मानव आधार सामाजिक संघ चे राजमुद्रा प्रदानकर्ते बाबु हिरमठकर संघटनेचे सल्लागार ज्येष्ठ पत्रकार अशोक कांबळे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दैनिक विशाल संविधानचे संपादक सुरेश राव सोनवणे, मानव आधार सामाजिक संघटनेचे देहूरोड शहराध्यक्ष संतोष दूधघागरे मानव अधिकार संरक्षण संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष रजाक शेख पत्रकार चंद्रशेखर पात्रे यांच्या उपस्थितीत राजमुद्रानावरण नाम फलकाचे अनावरण केले. 

या वेळी मानव अधिकार संरक्षण संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष एम डी चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले जनहिताच्या कोणत्याही समस्या निवारणासाठी देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्डाचे डॉ. अमित कुमार माने व त्यांच्या अधिकाऱ्यांचे अमोल सहकार्य असते त्या सहकार्यातूनच आजचे देहूरोड कँन्टोन्मेंट बोर्ड मानवाधिकार संरक्षण संघटना, मानव अधिकार सामाजिक संघाच्या माध्यमातून राजमुद्राचे अनावरण होत असल्याचे सांगून हे अभिमानास्पद बाब आहे खर तर राजमुद्रा अनावरण या अगोदरच झाले पाहिजे होते पण कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित कुमार माने यांच्या वेळ जुळत नसल्याने आज प्रजासत्ताक दिना रोजी अनावरण होत आहे असे मत एम डी चौधरी यांनी व्यक्त करून त्यांनी सर्वांचे आभार मानले.                             

या वेळी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अमित कुमार माने यांच्या हस्ते राजमुद्रा प्रदान करते बाबू हिरमेटकर यांच्या सन्मान मुख्य कार्यकारी अधिकारी अमित कुमार माने यांच्या हस्ते करण्यात आले, मनोनित सदस्य ॶॅड कैलाश पानसरे यांच्या सन्मान मानव अधिकार सामाजिक संघटनेचे संघटक परमेश विटकर यांच्या हस्ते करण्यात आले तर मावळ तालुका अध्यक्ष ईश्वर चलवादी देहूरोड शहर अध्यक्ष सन्नी दूधघागरे मानव आधार संरक्षण संघटनेचे मावळ तालुका अध्यक्ष रजाक शेख यांच्या सन्मान या वेळी करण्यात आला.

YOUR REACTION?

Facebook Conversations