आयुध निर्माण भंडार डेपोला ८२ व्या वर्षात प्रथमच पुरस्कार देऊन गौरव.
275
views

 देहूरोड दि. :- सीओडी डेपो पुणे  सदर्न कमांड  मध्ये  सदर्न कमांड प्रमुख आर्मी कमांडर भारतीय दक्षिण विभागाचे सेनापती  लेफ्टनंट जनरल अजयकुमार सिंह यांच्या हस्ते  सदर्न कमांड मध्ये कार्यरत २९ युनिटस व लष्करातील जवानांना शोर्य पदक देऊन गौरविण्यात आले.

२९ युनिटस मध्ये पुण्यभूमी देहूरोड जगतगुरु श्री संतश्रेष्ठ  तुकाराम महाराजांची भूमीत असणारा केंद्रीय आयुध भंडार डेपो ला ८२  व्या वर्षात प्रथमच हा  GOC-IN-C APPRECIATION UNIT असे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या ऐतिहासिक कार्यक्रमात डेपोतील कमांडट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांना गौरविण्यात आले.

दि. १/३ /२०२४ रोजी केंद्रीय आयुध भंडार देहूरोड (सी ओ डी डेपो ) येथे डेपो ला पुरस्कृत करण्यात आले . त्या निमित्ताने लष्करी बैंड सोबत मिलट्री लाईन पासून डेपो पर्यंत मिरवणूक शोभा यात्रा  काढण्यात आली. 

प्रथमतः मनोज कुमार शर्मा यांच्या शुभहस्ते जगतगुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, विश्वरत्न डाॅ . बाबासाहेब आंबेडकर व भक्ती शक्ति स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. 

डेपो ला पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने डेपोतील कमांडट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांनी सर्व कामगारांचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. 

कार्यक्रमात डेपोतील प्रशासकीय अधिकारी कर्नल मनोज सक्सेना लष्करी अधिकारी सैनिक व डेपोतील कामगार उपस्थित होते. 

डेपोतील सर्व युनियनच्या वतीने डेपोतील कमांडट ब्रिगेडियर मनोज कुमार शर्मा यांचे फेटा बांधून, शाॅल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व त्यांचा आभार मानले.

YOUR REACTION?

Facebook Conversations