खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता निलंबन न केल्यास औरंगाबाद बंदचा इशारा.

औरंगाबाद :-( प्रतिनिधी :चंद्रशेखर पात्रे )

                कधी कधी अधिकारी असल्याचे भान विसरून किंवा आपल्या अधिकाराचे दुरूपयोग करून आपल्या पदाचा गैरवापर करून दारूच्या नशेत महिलेची छेडछाड करून व महिलेच्या पतीला मारहाण केल्याने औरंगाबाद शहर चांगलेच तापले होते पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर महिलेची छेडछाड केल्या प्रकरणी रविवारी दिनांक १५ रोजी विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांना निलंबित करण्यात आले आहे.


औरंगाबाद शहर पोलीस दलातील सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे यांच्यावर एका महिलेने विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर औरंगाबाद शहर चांगलेच तापले व या प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला होता. तर बुधवार पर्यंत ढुमे यांना निलंबित केले नाही तर शुक्रवारी औरंगाबाद शहर बंद ठेवण्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी दिला होता. त्यामुळे अखेर गृहविभागाने ढुमे यांना निलंबित करण्यात येत असल्याचा आदेश काढला आहे. तसेच निलंबन असे पर्यंत ढुमे यांना औरंगाबाद शहर पोलिसांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमूद केले आहे.                    


काय आहे प्रकरण?


सहायक पोलीस आयुक्त विशाल ढुमे रात्री एका हॉटेलमध्ये दारु पिण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा मित्र आपल्या पत्नीसोबत त्याठिकाणी आले होते. तिथे दोघांची भेट झाली. ढुमे यांनी आपल्याकडे गाडी नसल्याचे सांगून मित्राकडे लिफ्ट मिळेल का? असे मित्राला विचारले. त्यावेळी मित्राने होकार देत त्यांना आपल्या गाडीत बसवले.


गाडीत बसताना त्यांचा मित्र आणि त्यांची पत्नी पुढच्या सीटवर बसले होते. तर ढुमे मागील सीटवर बसले होते.


दरम्यान, दारुच्या नशेत असलेल्या ढुमे यांनी महिलेची छेड काढण्यास सुरुवात केली.


महिलेच्या पाठीवरुन हात फिरवायला सुरुवात केली.


त्यानंतर काही अंतरावर गेल्यावर त्यांनी वॉशरुमला जायचे असून, तुमच्या घरी घेऊन चल,


अशी विनंती मित्राला केली. तर घरी गेल्यानंतर तुमच्या बेडरुममधील वॉशरुम मला वापरायचे असल्याचे


म्हणत वॉशरुम वापरण्याची परवानगी मागितली. मात्र, तेथेही ढुमे यांनी महिलेची छेड काढली.तसेच महिलेच्या पतीला मारहाण केली. हा प्रकार शहरातील एका उच्चभ्रू परिसरात शनिवारी दि.१४ रोजी मध्यरात्री हा प्रकार घडला.

YOUR REACTION?

Facebook Conversations