सामाजिक कार्यकर्त्यांमुळे प्रकार उघडकीस शस्त्रक्रिया साठी साहित्य मागितले न आणुन दिसल्यास रुग्ण दगावण्याची भीती दाखवले, तसेच पोलीस केस करून अडकविण्याची धमकी.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

पुणे दि. :- सर डेव्हिड जे ससुन हे देशातील सुविख्यात रूग्णालय आहे अनेक परराज्यातील लोक विविध उपचारासाठी येथे दाखल होतात खर तर ससुन रुग्णालय हे गोरगरीबांन साठी आहे पुण्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयातील कारभार आता दिवसेंदिवस चव्हाट्यावर येऊ लागला आहे. येथील डॉक्टर दिवसेंदिवस गब्बर होत चालेले आहे काही दिवसांपूर्वी ड्रग माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणांमध्ये अनेक दिवस उपचाराचा नावाखाली ड्रग रॅकेट चालवत होता यामुळे रुग्णालयाचे लक्तरे वेशीवर टांगले गेल्यानंतर महीनाभर पुर्वी उद्योगपती पुत्र काल्याणीनगर दुहेरी बळी प्रकरणी पोर्शे कार अपघात प्रकरणातसुद्धा या डॉक्टरांनी कारनामा केल्याचे समोर आलं आहे. त्यामुळे ससुन रुग्णालय हे धनिकांचे आहे कि गरीबाचे असे प्रश्न सर्वांना पडला आहे 

ससून रुग्णालयातील फॉरेन्सिक विभागाचा प्रमुख डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांनी बिल्डर विशाल अग्रवालच्या  अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी ब्लड सॅम्पल घेऊन ते कचऱ्याच्या डब्यात फेकून दिलाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. मागेच उंदीर चावल्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप रूग्णाच्या नातेवाईकांनी केला.

आता ससूनच्या डॉक्टरांनी खाजगी मेडिकल वाल्यांशी दुकानदारी थाटल्याचा प्रकार समोर आला आहे. रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाइकांना खासगी मेडिकल मधून औषधे, शस्त्रक्रियेचे साहित्य खरेदी करण्यास सांगत न्युरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल २४ हजार ५०० रुपयांची मागणी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. इतकेच नव्हे तर पैसे न दिल्यास पेशंट दगावण्याची भीती घालतानाच नातेवाइकांना पोलिस केस मध्ये अडकवण्याची धमकीही या डॉक्टरने दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील सय्यदनगर भागात एक विधवा महिला असून, तिच्या १७ वर्षीय मुलावर ससून रुग्णालयात काही दिवसांपूर्वी मेंदूची शस्त्रक्रिया झाली डिस्चार्ज करते वेळी मात्र न्युरोसर्जरी विभागातील निवासी डॉ. किरण याने त्यांना २४ हजार ५०० रुपयांचे किट मेडिकल तेजपाल मेडिकलमधून आणण्यास सांगितले.

तसेच तेजपाल मेडिकलमध्ये ते पैसे भरण्यास सांगितले. यानंतर रुग्णांच्या नातेवाइकांनी कोंढव्यातील जुबेर मेमन या सामाजिक कार्यकर्त्याशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्या लोकांनी हे स्टिंग ऑपरेशन करून हा प्रकार उघडकीस आणला. या स्टिंगमध्ये संबंधित डॉक्टर हा रुग्णाच्या नातेवाइकांना पैसे मागताना दिसत आहे. आता ससूनमधून नव्याने समोर आलेल्या या प्रकाराला पाठीशी घातलं जाणार की कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे नवनवीन कारनामे रोजच पुढे येत आहेत यामुळे लोकांचा ससुन रुग्णालयावर विश्वास कमी होताना दिसत आहे.

YOUR REACTION?

Facebook Conversations