देशातील संरक्षण कामगारांची दिवाळी सुकी ठेवल्याचा निषेधार्थ ,देशभरातून निषेध , असंतोष ,देहूरोड सी. ओ.डी.डेपो चे कामगार धरणे अंदोलना द्वारे मोदी सरकार विरूद्ध असंतोष व्यक्त करून निषेध व्यक्त करणार.

देहूरोड :

                 देशभरातील केंद्रीय कामगारांना विशेष करुन संरक्षण क्षेत्रातील असंख्य कामगारांना जे सेना, आयुध कोर मध्ये आर्मी, हवाई फोर्स, नेव्ही ,ई .एम.ई या दलात कार्यरत संरक्षण कामगारांना बोनस आदेश देण्यात आले नाही .४०दिवसाचे बोनस मिळतात पण रक्षामंत्रालय व वित्तमंत्रालय द्वारा कोणत्याही प्रकारचा आदेश जाहीर न करता लाखो कामगारांना दिवाळी बोनस पासुन वंचित ठेवले आहे.


दशहरा निमित्ताने मिळणारे बोनस दिवाळी आली तरी अद्याप अजून जाहीर नाही .

त्या मुळे देशभरातील संरक्षण विभागातील कार्यरत संरक्षण कामगार वर्गात असंतोष पसरला आहे.असंतोष संरक्षण कामगांरानी याचा निषेध केला आहे.


           दि. २२।१०। २०२२रोजी देहूरोड सी ओ डी च्या सर्व कामगार संघटनेचे वतीने केंद्र सरकारने बोनस आदेश जारी केले नसल्यामुळे असंतोष व्यक्त करून संरक्षण कामगारांना दिवाळी बोनस न देता .बोनस पासुन वंचित ठेवले .त्या निषेधार्थ केंद्र सरकारचा धिक्कार करून निषेध व्यक्त केला.  


तसेच येत्या काही दिवसांत केंद्र सरकारने संरक्षण कामगारांना न दीपावली शुभेच्छा दिल्या व दिवाळी बोनस देण्याचे आश्वासन दिले. ऐन दिवाळीत न बोनस त्या निषेधार्थ लौकरच धरणे व निदर्शने अंदोलन करुन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करणार असल्याचे संरक्षण कामगार नेते संजय डुमडे यांनी सांगितले. 


सी ओ डी वर्कर्स युनियन

सी ओ इंटक युनियन

सी ओ डी भारतीय मजदूर संघ

सी ओ डी बहुजन कामगार संघ

सी ओ डी वर्क्स कमिटी

सी ओ डी वर्कर्स को-ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेड

तसेच सर्व असोसिएशन चे वतीने असंतोष व्यक्त करून याचे निषेध व्यक्त केल्याचे संरक्षण कामगार नेते तथा देहूरोड सी. ओ. डी. डेपो. कामगार संघटनेचे सचिव संजय जगदीश डुमडे यांनी पत्रकारांना सांगितले.

YOUR REACTION?

Facebook Conversations