पुणे सोमवार पेठेतील साप्ताहिक विशाल संविधान कार्यालयात राष्ट्रीय द जस्ट आज वृत्त वाहिनी चे वृत्त संपादक अशोकराव कांबळे यांच्या उपस्थितीत अभीष्टचिंतन सुरेशदादां वर शुभेच्छांचा वर्षाव.

           पुणे शहरातील अग्रलेखांचे बादशहा, साप्ताहिक विशाल संविधान वृत्त पत्राचे मुख्य संपादक ,नॅशनल अवॉर्ड पुरस्कर्ते आणि ७२ वर्षात पदार्पण केलेले यंग मॅन सुरेशदादा सोनवणे यांचा वाढदिवस सोमवार पेठेतील साप्ताहिक विशाल संविधान कार्यालयात संपन्न झाला.


       योगा योग असा की पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात दि. ११ऑक्टोबरला सांयकाळी ४वा.दरम्यान जेष्ठ पत्रकार व राष्ट्रीय द जस्ट आज वृत्त वाहिनी चे वृत्त संपादकअशोकराव कांबळे यांनी त्यांनी केलेल्या समाज हिताच्या संकल्प योजना चे निवेदन सर्वांना सामाजिक न्याय देणारे पुणे जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले व त्यांना योजना साकार करण्यासाठी पुढाकार घेण्याची विनंती केली.

      जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व्हरांड्यात येताच साप्ताहिक विशाल संविधान वृत्त पत्राचे मुख्य संपादक सुरेशदादा सोनवणे यांना त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे जिवलग अशोकराव कांबळे यांची आठवण आली. त्यांनी अशोकराव यांना भ्रमण ध्वनीवरून दादा कुठे आहात असे विचारता अशोकरावांनी जिल्हाधिकारी कार्यालयात असे सांगताच सुरेश दादा अशोकरावांना म्हणाले दादा दुधात साखर पडली. दादा आज माझा वाढदिवसाचा केक तुमच्या सहवासात कापुन आनंद साजरा करायचा आहे. काम आटोपली की कार्यालयात या सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयातील काम आटोपलेले होते.काही कामे होती .ते टाळुन क्षणांचा ही विलंब न करता अशोकराव कांबळे थेट सा. विशाल संविधान कार्यालय गाठले. तेंव्हा कार्यालयांतील मान्यवर तयारी करीत होते. तत्पूर्वी साप्ताहिक विशाल संविधान च्या उप संपादिका साहिन शेख यांनी संपादक सुरेशदादां चे अभीष्टचिंतन केले होते. सहकाऱ्यांनी वाढ दिवसाचा केक आणला. तेवढ्यात अशोकराव म्हणाले अहो दादा पाच मिनिटे थांबा मी शाल पुष्पगुच्छ आणतो तेंव्हा सुरेशदादा म्हणाले दादा शाल गुच्छ काही नको तुम्ही आले. मला सगळे काय गोड मिळाले फक्त तुमच्या सहवासात वाढदिवसाचा केक कापायचे होते. तेंव्हा सुरेशदादां सुरेशदादांनी उपस्थितांचे टाळ्यांच्या गजरात वाढ दिवसाचा केक कापला .अशोकराव कांबळे व सुरेशदादा सोनवणे यांनी एकमेकांना अलीग॔ण देउन व केक भरवुन आनंद व्यक्त केला.शाहिन शेख,अजय सोनवणे, पोपटराव भोसले यांच्या सह शेजारील विविध कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी सुरेशदादांनी केक भरवुन शुभेच्छा व्यक्त करत अभिनंदनाचा वर्षाव केला .


        सुरेशदादा सोनवणे यांची समाजाच्या सर्व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आक्रमक भूमिका असते. त्या साठी त्यांनी सन ९६ साली विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महामानवाची प्रेरणा घेऊन पुण्यभुमीतुन साप्ताहिक विशाल संविधान वृत्तपत्र सुरू केले.त्याचे प्रकाशन आज तगायत अव्याहत पणे चालू ठेवले.साप्ताहिक विशाल संविधानातुन सडेतोड आक्रमक आग्रलेखांने शासकीय प्रशासनाला धारेवर धरून संबंधित अधिकाऱ्यांना अन्याय अत्याचार झालेल्या संबंधितांना सामाजिक न्याय द्यायला भाग पाडत असे. ते कार्य आज पर्यंत कार्यरत आहे. साप्ताहिक विशाल संविधान संपादक सुरेशदादा सोनवणे यांच्या समाज हिताच्या सडेतोड अग्रलेखांचे दखल घेऊन अटल भारत क्रिडा एंव कला संघ भारत या संस्थेने घेऊन पुण्यनगरी वानवडी मधील म.फुले सांस्कृतिक भवनात २ २ मे २०२२ च्या आयोजित समारंभात साप्ताहिक विशाल संविधान चे मुख्य संपादक कुमार सुरेशदादा सोनवणे यांना अटल नॅशनल अवॉर्ड प्रदान करून गौरव केला. सर्व सामान्यांचा न्यायासह पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संपादक पत्रकार न्याय मंच हि संघटना स्थापना करून साप्ताहिक संपादक, पत्रकारांची समस्या सोडविण्यासाठी वयाची ७१ ओलाडंली तरी ही आज तगायत अहो रात्र झटत आहेत. अशा सेवाभावी कर्तृत्वान तळागाळातील संपादक सुरेशदादा सोनवणे यांचा उपस्थितांनी वाढदिवस साजरा करून आनंद द्विगुणित करीत त्यांच्या सेवाभावी कार्याला सलाम केला.

YOUR REACTION?

Facebook Conversations