पक्षाच्या अनेक नेते व कार्यकर्ता मध्ये संतापाची लाट, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी केली कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल.

प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे.

मुंबई दि. १४ :- अभिनेत्री केतकी चितळे विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बाबत वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केले आहे केतकी चितळे हे वादग्रस्त पोस्ट साठी ओळखले जाते पुन्हा एकदा शरद पवार याच्या बद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याने पुन्हा चर्चेत आली आहे मराठी अभिनेत्री केतकी चितळे ही तिच्या सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत असते. केतकी चितळे हिने तिच्या फेसबुकवर पोस्ट शेअर केल्यामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक पोस्ट केतकी हिने शेअर केली असून या पोस्टनंतर तिला ट्रोल करण्यात येत आहे. केतकी चितळे विरोधात कळवा येथे गुन्हा देखील दाखल झाला आहे.


केतकी चितळे ही सोशल मीडियावर बेधडकपणे केलेल्या वक्तव्यांमुळे यापूर्वीही अनेकदा अडचणीत सापडली आहे. वकील नितीन भावे नावाच्या व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकी चितळेने शेअर केली असून यात कवितेच्या स्वरूपातून शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट शेअर केल्यामुळे पक्षातील नेते, कार्यकर्त्यांन मध्ये राग अनावर झाले आहे व संतापाची लाट उसळली आहे आणि लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी म्हटले आहे. तसेच केतकीने ही पोस्ट करुन दोन राजकीय पक्षांमध्ये द्वेषाची भावना, तेढ निर्माण करण्याचे कृत्य केले आहे, असेही ते म्हणाले.

शरद पवार यांना उद्देशून बदनामीकारक, मानहानीकारक पोस्ट केतकीने केली असल्याची तक्रार स्वप्नील नेटके यांनी कळवा पोलिस ठाण्यात केली आहे. कळवा पोलिस ठाण्यात कलम ५००, ५०५(२), ५०१ आणि १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, केतकीला अटक होण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.


=================

वृत्त संपादक अशोक कांबळे. बातमी व जाहीराती साठी🗣📲📞. {9767508972} {7219500492} {9850826340}

=================

केतकी चितळे यांनी केलेली पोस्ट

केतकी चितळे यांनी केलेली पोस्ट

YOUR REACTION?

Facebook Conversations