आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाल्याने विविध क्षेत्रातुन के. एच. सुर्यवंशी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव.

   देहूरोड दि. २२ :- जागतिक संविधान व सांसद असोशिएशन या अमेरिकेत कार्यरत असलेल्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चळवळीतील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात येत असतो. असेच हव्यास पोटी न जाता समाजाला काही तरी देणे लागते ते दिलेच पाहीजे, प्रत्येकांवर तीन ऋण असतात मातृऋण,पीतृऋण,आणि सामाजिक ऋण या पैकी समाजाला आपले कार्य करत समाजिक ऋण फेडणे हे आपले कर्तव्य आहे असे सदा सर्वदा लोक कल्याणसाठी न थांबता न थकता अहोरात्र काम करणारे जेष्ठ धम्म नेते यांना सन २०२३ या वर्षी दिल्या गेलेल्या आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते धम्म उपासक के. एच. सूर्यवंशी यांना शैक्षणिक व सामाजिक कार्यात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना जागतिक संविधान अंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. अहमदनगर तालुका श्रीरामपूर येथील व्ही.आय.पी. गेस्ट हाऊस येथे आयोजित भव्य कार्यक्रमात डाॕ. दत्ता विघावे, महाराष्ट्र चॅप्टर वर्कींग कमिटी अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

 के एच सूर्यवंशी यांच्या कार्याचा संक्षिप्त आढावा

 भारत सरकार रक्षा मंत्रालय - आॕर्डनन्स फॕक्टरी देहूरोड, पुणे येथून ज्युनियर वर्कस मॕनेंजर या पदावर

सन १९८२ पासून अर्थात गेल्या ४० वर्षां पासून विविध चळवळीत सक्रीय सहभाग व योगदान.

१) १९८७ मध्ये बोपोडी पुणे येथे भीमज्योत तरुण मंडळाची स्थापना करुन अध्यक्षपदी कार्यरत असताना संस्थे मार्फत परिसरात दुर्लक्षित भागात विविध उपक्रमा मार्फत समाजसेवा.१९८७-८९ काळात लोकसहभागातून समाज मंदिर (लुंबिनी) बुद्ध विहाराची निर्मिती.

२) १९८५ मध्ये भारत सरकार रक्षा मंत्रालय अंतर्गत आॕर्डनन्स फॕक्टरी देहूरोड, पुणे येथे नोकरीस लागल्यानंतर १९८७ मध्ये *पंचशील आॕर्डनन्स फॕक्टरी कामगार कल्याण मंडळ* या संस्थेची स्थापना केली व संस्थापक सचिव म्हणून कार्यरत राहिलो.

३) *भारतीय बौद्ध महासभा वार्ड शाखा बोपोडी, पुणे चा संस्थापक अध्यक्ष*

    बोपोडी येथील लुंबिनी बुद्ध विहाराची निर्मिती केल्यानंतर बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी महाउपासिका मिराताई आंबेडकर यांना बोलावले. त्यावेळीच ताईंच्या उपस्थिती मध्ये भा.बौ.महासभा बोपोडी वार्ड शाखेची स्थापना ताईंच्या हस्ते होवून त्यात माझ्यावर अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. ०४/६/१९८९ ते ३१/१२/१९९१ पर्यंत अध्यक्ष पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सप्टेंबर १९९१ मध्ये धम्मभूमी देहूरोड चे विकासाचे काम हाती घेतल्याने बोपोडीची जबाबदारी मित्रांकडे सोपविली. 

४) याच फॕक्टरीत १९८९ च्या दरम्यान *एस सी एस टी असोशिएशन ची स्थापना* संस्थापक सचिव म्हणून कार्य करीत असताना अनेक कामगारांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न.

५) देहूरोड, जि, पुणे येथे २५ डिसेंबर १९५४ रोजी डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या स्वहस्ते तथागत भ.बुद्ध मूर्तीची स्थापना करुन ऐतिहासिक धम्मभूमीची निर्मिती केली. असे हे ऐतिहासिक तिर्थक्षेत्र विकासा पासून वंचित असल्यामुळे त्याच्या विकास कामाला गती देण्यासाठी ०१/०९/१९९१ रोजी बुद्ध विहार कृती समिती या नावे संस्था स्थापन केली व संस्थापक सचिव म्हणून २००६ पर्यंत कार्यरत राहिलो. सदरहू जागा ही लष्कराच्या ताब्यातली असल्याने ती मुक्त करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागला, त्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. शेवटी १९९६ मध्ये २० गुंठे जागा क्षेत्र विकासासाठी राष्ट्रपती च्या वतीने डायरेक्टर डी. ई .ओ. व संस्थेच्या वतीने के. एच. सूर्यवंशी सेक्रेटरी म्हणून खरेदी खत झाले. महामानव विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी खरेदी करण्याचा मान मला मिळाला तिथेच जीवनाचे सार्थक झाले.

६) सेवा निवृत्ती नंतर विविध माध्यमातून समाजसेवा करण्या हेतूने शितळानगर देहूरोड, जि. पुणे येथे २०१४ मध्ये *धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था* या संघटनेची स्थापना करुन संस्थेचे संस्थापक/मुख्य विश्वस्त या पदावरुन स्थानिक व जिल्हा पातळीवर अनेक जनकल्याण अर्थात विवाह समारंभ, आरोग्य शिबीर, नेत्र चिकीत्सा शिबीर, व्याख्याने, अनेक मान्यवरांचा वाढदिवस व त्या निमित्ताने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करणे, इतकेच नाही तर गरजू, हुषार, होतकरु व निराधार अश्या जवळजवळ ५० विद्यार्थ्यांची सोय करण्यासाठी निवास, भोजन व शिक्षणाची सोय उपलब्ध करण्या हेतूने धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेस स्वतः खरेदी केलेली तीन गुंठे जागा दान स्वरूपात दिली असून त्या ठिकाणी *विद्यार्थी निवास संकुल* भवनाचे लोकसहभागातून बांधकाम सुरु आहे. ह्या अगोदर शैक्षणिक दृष्ट्या अनेक विद्यार्थी यांना विविध मार्गाने सहकार्य केले असून शैक्षणिक दृष्ट्या अनेक विद्यार्थी यांना सहकार्य करुन उत्तम नागरिक घडविण्याचा मानस आहे.

७) *महामाता रमामाई भीमराव आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाची उभारणी.*

 २०१४ मध्ये आयु. विठ्ठल गायकवाड यांचे नेतृत्व व अध्यक्षतेखाली महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली. या समितीच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी पार पाडीत असताना वाडीया काॕलेजच्या शेजारी पुणे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी रमाई उद्यान परिसरात *त्यागमूर्ती रमामाई भीमराव आंबेडकर* यांचा गनमेटल धातू मधील साडेनऊ फुट उंचीचा पूर्णाकृती पुतळा लोकसहभागातून तयार करुन भारताचे महामहिम राष्ट्रपती डाॕ. रामनाथ कोविंद यांचे हस्ते ३०/५/२०१८ रोजी लोकार्पण. 

८) *विश्वरत्न डाॕ.बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वाराची निर्मिती* धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्था, जि. पुणे या संस्थेच्या वतीने देहूरोड शहर बाजार पेठेतील भारतरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग या ठिकाणी लोकसहभागातून जवळपास अकरा लाख रुपये खर्चाची महाराष्ट्रात कुठेच आढळणार नाही अशी आगळी वेगळी कमान ( प्रवेशद्वार ) निर्माण करुन त्याचा लोकार्पण सोहळा १५/१०/२०२१ रोजी वंदनीय भन्तेगण यांचे हस्ते पार पाडला. 

९) आज रोजी देखील वरील संबंधित सर्व संस्था /संघटनेशी पूर्वी सारखेच संबंध आहेत. सोबतच धायरी, पुणे येथील भिम ज्योत बहुउद्देशीय सामाजिक संस्था , अमोलभाऊ नाईकनवरे युवा मंच, भारतीय बौद्ध महासभा तसेच पुणे जिल्ह्यातील अनेक सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रातील संघटना, पदाधिकारी व अनेक मान्यवरांच्या संपर्कात व छोट्या मोठ्या कार्यक्रमात सक्रीय सहभाग असतो. संस्थेच्या वतीने आज पर्यंत मंगल परिणय, गृहप्रवेश, नामकरण, पुण्यानुमोदन सारखे जवळपास ४५० पेक्षा जास्त धार्मिक विधी पार पाडले आहेत.

   विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदेशानुसार,चळवळीतील प्रत्येकाने *"Pay back to society" समाजाला काही तरी देणे लागते ते दिलेच पाहिजे* ह्या विचारसरणी नुसार आपणांस जेवढे शक्य होईल तेवढे समाजासाठी देत रहावे, अशी सुंदर माहिती द जस्ट वृत्त वाहीनीच्या प्रतिनिधी चंद्रशेखर पात्रे यांना माहिती देताना दिली. 

 १९८२ साला पासून बोपोडी पुणे येथून भीमज्योत तरुण मंडळाचे अध्यक्ष पदी कार्य करीत असताना लुंबिनी बुद्ध विहाराची निर्मिती, त्यानंतर आयुध निर्माणी देहूरोड येथील कामगार क्षेत्रात, देहूरोड शहरात विश्वरत्न डाॕ. बाबासाहेब आंबेडकर प्रवेशद्वार निर्मिती, पुणे येथील वाडीया काॕलेज समोरील रमामाई भीमराव आंबेडकर यांच्या स्मारकाची उभारणी, धम्मसदन, शितळानगर देहूरोड येथील आपल्या स्वतःची विकत घेतलेली तीन गुंठे जागा धम्मभूमी देहूरोड सामाजिक संस्थेस दान देऊन त्या ठिकाणी गरजू , होतकरु व हुशार विद्यार्थ्यांना राहण्यासाठी विद्यार्थी निवास संकुलाची निर्मिती करणे, देहूरोड ऐतिहासिक बुद्ध विहाराच्या विकासासाठी लष्करा कडून जमीन मिळविणे, विकासासाठी जनजागृती ते आंदोलन करणे अशी अनेक विधायक व भरीव कामे पूर्णत्वास घेऊन जाण्याचा प्रयत्न करणारे, प्रामाणिक, निस्वार्थ व पारदर्शक कारभार करणारी व्यक्ती अशी त्यांची ओळख असल्याने त्यांच्या कार्याची अमेरिकेत कार्यरत असलेल्या संस्थेच्या वतीने त्यांना पुरस्कार देऊन सन्मान केल्याने समाजातील विविध संघटना व आंबेडकरी चळवळीतील असंख्य मान्यवरांच्या वतीने त्यांच्या वर अभिनंदन व कौतुकाचे वर्षाव होत आहे. 

 या पुरूस्कार प्रदानच्या वेळी के एच सूर्यवंशी याचे जीवलग सहकारी अमोल नाईकनवरे, प्रकाश कांबळे रूईकर, परशुराम दोडमणी, विजय अल्हाट, रोहन गायकवाड, आकाश कटारे, प्रशांत भोसले, आदि मान्यवर उपस्थित होते.

YOUR REACTION?

Facebook Conversations